Chhatrapati sambhajinagar accident : छत्रपती संभाजीनगरमधील वैरागड परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दुचाकीच्या चाकातील चिखल काढत असताना भरधाव सिमेंट मिक्सरने पित्याला चिरडले, तर लेक मृत्यूशी झुंज देत आहे. डोळ्यांदेखत वडिलांचा अंत झाल्याने या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
‘चल बाळा तुला क्लासला सोडतो’; दुचाकीच्या चाकात चिखल अडकला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीला क्लासला सोडण्यासाठी निघालेल्या पित्याचा दुचाकीच्या चाकातील चिखल काढताना भरधाव सिमेंट मिक्सरने चिरडून मृत्यू झाला. मुलीच्या डोळ्यांसमोरच वडिलांचा दुर्दैवी अंत झाला, तर ती स्वतः गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी तिला क्लासला सोडायला निघालेल्या पित्यावर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने बाप-लेकीला तब्बल ५० फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात वडिलांचा मुलीच्या डोळ्यांदेखत जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
नेमकी घटना काय घडली?
भाऊसाहेब किसनराव शेजुळ रा. राजुरा, ता. गंगापूर असे मयत झालेल्या शेतकऱ्यांचं नाव तर शिवानी शेजूळ एस जखमी मुलीचे नाव आहे.दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब शेजुळहे सकाळी नेहमीप्रमाणे गावात दूध टाकून आले. त्यानंतर आपली मुलगी शिवानी हिला लासूर स्टेशन येथे क्लासला सोडण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. आदल्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. वैरागड येथील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीच्या चाकात चिखल अडकल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.
Crime News : 18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ
५० फूट फरफटत नेले
भाऊसाहेब हे खाली वाकून काडीने चाकातील चिखल काढत असतानाच, रस्त्याच्या कामावरील एका भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकने भाऊसाहेब यांना दुचाकीसह सुमारे ५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. मिक्सरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच करुण मृत्यू झाला.
मुलीसमोरच बापाचा अंत, शिवानी गंभीर
या अपघातातील सर्वात चटका लावणारी बाब म्हणजे, हा सर्व थरार पोटच्या मुलीच्या डोळ्यांसमोर घडला. अपघातात मुलगी शिवानी ही देखील गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा