• Mon. Jun 15th, 2026

    मुंबई पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे! दोन दिवसांत 80 वाहनांवर कारवाई, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या खासगी वाहनांचा समावेश

    मुंबई पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे! दोन दिवसांत 80 वाहनांवर कारवाई, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या खासगी वाहनांचा समावेश

    Mumbai Traffic Police Action On Illegal Flashing Lights: ​पोलिसांनी खासगी वाहनांवरील दिवे उतरवतानाच त्यांच्या चालक आणि मालकांना दंड ठोठावला आहे.

    पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : महापौर रितू तावडे यांनी वाहनांवर लावलेल्या लाल-निळ्या फ्लॅश लाइटनंतर व्हीआयपींच्या वाहनांवरील दिवे पुन्हा चर्चेत आले होते. ही व्हीआयपी संस्कृती रडारवर आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ८० वाहनांवरील दिवे उतरविले. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, व्हीआयपी व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांच्या खासगी वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी या धडक मोहिमेत लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे ८० दिवे आणि तीन सायरन जप्त केले.

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिस, पालिका, रुग्णालये, अग्निशमन दल अशा आपत्कालीन सेवा वगळता अन्य कुणालाही वाहनांवर कोणत्याही प्रकारचे दिवे वापरण्याची परवानगी नाही. असे असतानाही आमदार, खासदार, मंत्री, त्यांचे पीए तसेच राजकीय क्षेत्रातील इतर नेते आणि त्यांचे नातेवाईकही व्हीआयपी वागणूक मिळावी तसेच वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी वाहनांवर लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे डोम लाइट्स (फ्लॅशिंग दिवे) लावून फिरताना दिसतात. याबाबत वाहतूक पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यातच महापौर रितू तावडे यांच्या वाहनांवरील फ्लॅशिंग दिवे अधिकच चर्चेत आले.

    Maharashtra TimesAcid Attack: मालाडमध्ये 600 रुपयांच्या वादातून अंगावर फेकलं ॲसिड; 7 ते 8 जण होरपळले
    वाहतूक पोलिसांनी वांद्रे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात १ आणि २ एप्रिल रोजी विशेष मोहीम हाती घेतली. मरीन ड्राइव्ह वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारवाई करण्यात आली. तर, व्हीआयपी रेलचेल असलेल्या वांद्रे परिसरात सहायक पोलिस आयुक्त मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

    तक्रार करा
    खासगी वाहनावर कुणी पिवळा, निळा किंवा लाल रंगाचा दिवा अथवा फ्लॅशिंग लाइट लावले असल्याचे दिसल्यास त्याची तक्रार मुंबई किंवा वाहतूक पोलिसांच्या ‘एक्स’ अकाउंटवर किंवा वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Maharashtra TimesMumbai News: महापालिकेची विक्रमी करवसुली; आर्थिक वर्षात सात हजार 610 कोटी 90 लाख रुपये संकलित
    वाहनांची नोंदणी रद्द होणार?
    ज्या वाहनांवर कारवाई करण्यात आली, त्या वाहनांचा तपशील आरटीओकडे पाठविण्यात येणार असून, या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. इतकेच नाही तर पुढील कारवाईसाठी या वाहनांचे चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा