• Sat. Jun 13th, 2026

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 3, 2026
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली – महासंवाद

    Oplus_131072

    मुंबई, दि.03 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

    याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सचिव विजय कोमटवार, उप सभापती यांचे खाजगी सचिव आविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed