• Sun. Aug 9th, 2026
    Mumbai News: महापालिकेची विक्रमी करवसुली; आर्थिक वर्षात सात हजार 610 कोटी 90 लाख रुपये संकलित

    Mumbai News: ३१ मार्चला एकाच दिवशी ३९९ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल संकलित करून नवीन विक्रमही नोंदविण्यात आला. सर्वाधिक कर संकलन पश्चिम उपनगरातून झाले आहे.

    मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या सात हजार ३४१ कोटी रुपयांच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत महापालिकेने सात हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतका मालमत्ता कर संकलन केला आहे.

    मुंबईकरांना महापालिकेतर्फे विविध नागरी सेवा व सुविधा पुरविल्या जातात. या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सक्षम आर्थिक स्रोतांची आवश्यकता असते. त्या दृष्टीने, मालमत्ता कर हा एक अत्यंत महत्त्वाचा महसुली स्रोत आहे. मुंबईकरांनी वेळेत मालमत्ता कर भरावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. करभरणा सुलभ व्हावा, यासाठी साप्ताहिक, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आणि ऑनलाइन भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून मागील थकबाकी वसुलीसाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात आला.

    Maharashtra TimesMumbai News: 12 वर्षीय मुलीला असह्य वेदना; पोटातून काढला मोठा केसांचा गोळा, 3 तास चालली शस्रक्रिया
    मुंबई महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सात हजार ३४१ कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्धारित कालावधीदरम्यान सात हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या १०३.६८ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात ३०१ कोटी १३ लाख रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesNCP Politics: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पदच्युत? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या पत्राने वाद, पदांचा उल्लेख नाही
    प्रशासकीय कामगिरीचा विचार करता, ‘के’ पूर्व (७१९ कोटी २३ लाख रुपये), ‘जी’ दक्षिण (६७० कोटी ६४ लाख रुपये), ‘के’ पश्चिम (६२२ कोटी १६ लाख रुपये), ‘एच’ पूर्व (५७७ कोटी ७८ लाख रुपये) आणि ‘एच’ पश्चिम (५३६ कोटी ५५ लाख रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.

    एकूण संकलित कर

    शहर विभाग —२,१०२ कोटी ६० लाख रुपये
    पश्चिम उपनगरे —३,७२१ कोटी ३३ लाख रुपये
    पूर्व उपनगरे —१,४५७ कोटी ४१ लाख रुपये

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा