• Sun. Jun 7th, 2026
    Jalgaon Accident : आईला भेटायला जाताना लेकीवर काळाची झडप, भीषण अपघातात चंचलचा मृत्यू; आई वाटच बघत राहिली

    Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

    दसेगाव फाटा डंपर अपघात तरुणीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : दुचाकीवर आईला भेटण्यासाठी जात असतानाच चंचल लांडगे (वय २१) या तरुणीचा डंपरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी चौधरी ही गंभीर जखमी झाली तिच्यावर उपचार सुरू असून नागरिकांनी आज महामार्ग रोखून धरला.

    नेमका कसा झाला अपघात?

    चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या दसेगाव फाट्याजवळ एक भयानक भीषण अपघात झाला आहे. चंचल लांडगे आणि तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी ही दोघेही चंचलच्या आईला भेटण्यासाठी दुचाकीवर जात होते. वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकील जोरदार धडक दिल्यानं चंचलच्या डोक्याला जबर मार लागल्याने डंपर खाली चिरडून तिचा मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी ही जखमी झाली आहे.
    Maharashtra TimesPune Rain News : पुण्यात झाड कोसळून फुलविक्रेता महिला दगावली, प्रशासनाविरुद्ध नागरिक संतप्त

    चंचलचा जागीच अपघात

    दोघेही धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ पोहोचल्या असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने दुचाकीला मागून धडक दिली. डंपरची धडक बसल्यामुळे तरुणी खाली पडल्या या अपघातात चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की डंपरने काही अंतर दूर दोघींना फरफटत नेलं. या अपघातात चंचलची मैत्रीण वैष्णवी चौधरी ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या वैष्णवीला तातडीने रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

    अपघातानंतर नागरिकांचा रास्ता रोको

    अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं, तरी आरोपींना वाचवण्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित डंपरमध्ये अवैध वाळू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेत चालक आणि क्लिनरला अटक केली आहे.
    Maharashtra TimesNagpur News : 15 वर्षांची नवरी, 35 वर्षांचा नवरदेव, नागपुरात बाल संरक्षण विभागाने रोखला बालविवाह

    माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

    काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. जळगावच्या धरणगाव येथे धरणगाव नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचे पुत्र अविनाश चौधरी यांचे अपघाती निधन झालं. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात शोकळला पसरली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली. पण अपघाताची घटना इतकी भीषण होती की, अविनाश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा