• Sun. Jun 14th, 2026
    Pathardi Crime : ऊसतोडीच्या पैशांवरुन वाद, जन्मदात्या बापानेच लहान मुलीसमोर मोठ्या लेकीला संपवलं; बॉडीजवळ आईचा आक्रोश

    Ahilyanagar Father Killed Daughter : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

    पाथर्डी वडिलांनी मुलीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर, अनिकेत यादव : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील एरंडगाव समसूद येथे आज बुधवारी घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पैशांच्या वादातून एका वृद्ध बापानेच संतापाच्या भरात स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली. तर तिला वाचवण्यासाठी धावलेल्या दुसऱ्या मुलीलाही मारहाण करून जखमी केलं. या अमानुष प्रकारामुळे गावात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे.

    पैशांवरून झाली वादाला सुरुवात

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती ही तिची मोठी बहीण मिर्चाना हिच्यासह वडील जयराम भोसले यांच्या एरंडगाव येथील घरी भेटीसाठी आली होती. ऊसतोड कामासाठी दिलेल्या पैशांवरून कुटुंबात वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद हळूहळू तीव्र होत गेला आणि घरातील वातावरण तणावपूर्ण बनलं. संतापाच्या भरात जयराम भोसले यांनी घरातच असलेली कुऱ्हाड उचलली आणि कोणतीही तमा न बाळगता मिर्चाना हिच्यावर जीवघेणा वार केला.
    Maharashtra TimesICICI Bank: नागपुरातील ICICI बँकेतील गोल्ड लोन घोटाळा उघडकीस; खातेधारकाने बनावट दागिने ठेवून तब्बल 23 कोटींचं कर्ज घेतलं
    चेहऱ्यावर आणि मानेवर झालेल्या गंभीर जखमांमुळे मिर्चाना हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बहिणीला वाचवण्यासाठी भारती धावून आली असता आरोपीनं तिच्यावरही हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात भारती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

    आरोपी बापाला अटक

    घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आरोपी जयराम शंकर भोसले (वय ६५, रा. एरंडगाव) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
    Maharashtra TimesAshok Kharat Son : कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश, अशोक खरातच्या मुलाला फिल्मी स्टाईल अटक; बायको फरार
    कुटुंबातील किरकोळ वाटणारा पैशांचा वाद इतक्या भीषण टोकाला जाईल, याची कल्पनाही गावकऱ्यांना नव्हती. या घटनेनं नातेसंबंधांतील ताणतणाव आणि वाढती हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा