• Sat. Jun 20th, 2026

    Ahilyanagar News : ‘पप्पा आता हे सहन होत नाही’; मूल होत नाही म्हणून सासू-सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, 25 वर्षीय ऋतुजाने जीवनयात्रा संपवली

    Ahilyanagar News : ‘पप्पा आता हे सहन होत नाही’; मूल होत नाही म्हणून सासू-सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, 25 वर्षीय ऋतुजाने जीवनयात्रा संपवली

    अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुला बाळ का होत नाही आहे, या प्रश्नाचा भडिमार करत सासू सासऱ्यांनी एका विवाहितेला टोमणे मारले. हे टोमणे विवाहिता ऋतुजाला सहन न झाल्याने तिने आयुष्याची दोर कापली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ‘पप्पा आता हे सहन होत नाही’; सासू सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, 25 वर्षीय ऋतुजाने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: संतानप्राप्तीसाठी सासरकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील नवनागापूर येथील सम्राट नगर परिसरात ही घटना उघडकीस आली. ऋतुजा तुषार राजळे (माहेरचे नाव ऋतुजा अर्जुन खुटवड, वय २५) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अपमानास्पद वागणूक

    मृत ऋतुजाचे लग्न २२ एप्रिल २०२५ रोजी तुषार प्रकाश राजळे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच सासू-सासऱ्यांनी तिच्यावर मूल होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. “तू गर्भवती का राहत नाहीस? तुला दर महिन्याला पाळी येते का?” अशा अत्यंत वैयक्तिक आणि अपमानास्पद प्रश्नांनी तिचा मानसिक छळ केला जात होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

    ‘माझी सहनशक्ती संपली आहे’

    मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ऋतुजाने आपल्या वडिलांना फोन करून सासरचा त्रास सहन होत नसल्याचे सांगितले होते. “माझी सहनशक्ती आता संपली आहे,” अशा शब्दांत तिने आपली वेदना व्यक्त केली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी तिची समजूत काढून धीर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सासरचा छळ थांबला नाही.

    Maharashtra TimesAccident News : मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना वडिलांवर काळाची झडप, लग्नाच्या घरावर शोककळा

    सुसाईड नोटमुळे सासरच्यांचे पितळ उघडे

    २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ऋतुजाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी ऋतुजाने एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने सासू आणि सासऱ्यांच्या जाचाला कंटाळूनच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या चिठ्ठीमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

    सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    याप्रकरणी मृत तरुणीची आई नंदा अर्जुन खुटवड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे प्रकाश एकनाथ राजळे आणि सासू भारती प्रकाश राजळे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच ऋतुजाचा संसार अशा प्रकारे संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आजही समाजात संतानासाठी विवाहितांचा होणारा छळ हा चिंतेचा विषय ठरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा