• Fri. Jun 12th, 2026

    Mumbai Local: लोकल, मेल-एक्सप्रेस खोळंबणार नाहीत! रेल्वे फाटक बंद करून पूल व बोगदे बनवणार; कल्याण-लोणावळा मार्गावर 10 उड्डाणपूल

    Mumbai Local: लोकल, मेल-एक्सप्रेस खोळंबणार नाहीत! रेल्वे फाटक बंद करून पूल व बोगदे बनवणार; कल्याण-लोणावळा मार्गावर 10 उड्डाणपूल

    Central Railway Crossings: रेल्वे मार्गावरील अनेक फाटकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुंबी उपनगरिय रेल्वे मार्गावरील सर्व फाटक बंद करून त्यावर उड्डाणपूल किंवा रुळांखाली बोगदे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश चेमटे, मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्यांच्या मेल गाड्यांच्या वक्तशीरपणासह वेगाला अडथळा ठरणाऱ्या दहा रेल्वे फाटक आता कायमस्वरूपी बंद होणार आहेत. मध्य रेल्वेने कल्याण ते लोणावळादरम्यान रेल्वे उड्डाणपूल (‘रेल ओव्हर ब्रिज’) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे. यासाठी मध्य रेल्वेने कार्यादेश दिले आहेत. या पुलांमुळे मुंबई–पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

    उड्डाणपूल आणि बोगदे तयार करणार

    रेल्वे फाटकावरील होणारे अपघात शून्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे फाटक बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रेल्वे फाटक बंद करून शक्य त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल (‘आरओबी’) आणि रुळांखाली बोगदा तयार करून ये-जा करण्याचा मार्ग (‘आरयूबी’) तयार करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने दिल्या आहेत.Maharashtra TimesMumbai Local: ऐन उन्हाळ्यात मुंबईकर प्रवाशांसमोर नवं संकट; लोकल स्टेशनवर वेगळीच ‘शिफ्ट’, उन्हाचा त्रास असह्य!

    रेल्वे फाटक बंद करून त्या जागी पूल उभारण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. यासाठी एकूण १८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सर्व पूल उभारणीसाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पूल उभारणी कामाचे कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    रेल्वे फाटक उघडणे, वाहनांची वाहतूक होणे आणि फाटक बंद होणे यासाठी एका फाटकात सरासरी आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. वाहनांची वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी वेळेत वाढ ही अपेक्षित आहे. शिवाय फाटक उघड-बंद किती वेळा होते यावरदेखील वेळ निश्चित होतो. फाटक असलेल्या ठिकाणी वेगमर्यादा लागू केली जाते. याचे पालन करण्यासाठी रेल्वेगाड्या किमान वेगाने चालवण्यात येतात.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

    सकारात्मक परिणाम…

    • कल्याण ते लोणावळा विभागातील फाटक बंद केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, खोपोली लोकल गाड्यांना फायदा होईल
    • मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसलादेखील याचा लाभ मिळणार आहे
    • फाटक बंद होणार असल्याने त्याचा रेल्वे वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे

    “भिवपुरी ते कर्जतदरम्यान तीन, बदलापूर ते वांगणीदरम्यान दोन, वांगणी ते शेलूदरम्यान दोन, नेरळ ते भिवपुरीदरम्यान दोन आणि शेलू ते नेरळदरम्यान एक असे एकूण दहा पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेचे मख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी दिली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा