• Tue. Jun 9th, 2026

    Pune Crime: पुण्यात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात संताप

    Pune Crime: पुण्यात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात संताप

    Daund Murder News: तरुणाच्या खून प्रकरणात ऋषिकेश भोसले यांनी तक्रारी दिली. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्यामध्ये सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुण्यात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात संताप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव येथे जुन्या जमिनीच्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करत एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजेगाव इथं राहणाऱ्या विजेंद्र भोसले या तरुणाचा काही व्यक्तींशी जमिनीच्या व्यवहारावरून जुना वाद सुरू होता. हा वाद चिघळत गेला आणि त्यानंतर आरोपींनी विजेंद्र भोसले यांच्यावर हल्ला चढवला. कोयता व काठ्यांच्या साहाय्याने भोसले यांना बेदम मारहाण करण्यात आली. याच दरम्यान आरोपींनी कोयत्याने त्यांचा गळा चिरल्याने घटनास्थळीच विजेंद्र भोसले यांचा मृत्यू झाला.

    या घटनेनंतर राजेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खून प्रकरणी ऋषिकेश भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत जनार्धन भोसले व महेश भोसले या दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ऋषिकेश भोसले यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जमिनीच्या वादासह या हत्या प्रकरणामागे इतर कोणते कारण आहे का, याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा