• Wed. Jul 29th, 2026

    तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 29, 2026
    तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २९ :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंनी ३० जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी केले आहे.

    जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी स्वतंत्र पुरस्कारही प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणाऱ्या खेळाडूंची कामगिरी सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. संबंधित साहसी उपक्रम हे जमीन, पाणी किंवा हवाई क्षेत्रातील असावेत तसेच खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट स्वरूपाची असणे आवश्यक आहे.

    पुरस्कारासाठीची नामांकने केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरच स्वीकारली जाणार असून, मंत्रालयाकडे ऑफलाइन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जांची कोणतीही दखल घेतली जाणार नाही व ते थेट नाकारण्यात येतील, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed