• Sat. Aug 29th, 2026
Ashwini Bhide यांच्या नियुक्तीसाठी फडणवीसांची शिंदेंसोबत चर्चा, BMC आयुक्तपदी का झाली निवड?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्या नावासाठी, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असणारे असीम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्या मतालाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा सुरू होती. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेत अर्धा तास चर्चा केली. या भेटीगाठींनंतर भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed