• Wed. Jun 10th, 2026

    Pune News: मतभेदामुळे विभक्त, पत्नीला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दरमहा ३० हजार पोटगी द्या; पुणे कोर्टाचा पतीला आदेश

    Pune News: मतभेदामुळे विभक्त, पत्नीला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दरमहा ३० हजार पोटगी द्या; पुणे कोर्टाचा पतीला आदेश

    Pune Court Order: पत्नीची शैक्षणिक ओढ व सध्याची आर्थिक स्थिती पाहता, तिला सन्मानाने जगण्यासह शिक्षण पूर्ण करण्यासाठी ३० हजार रुपये इतकी पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

    पोटगीच्या आधारे परीक्षेची तयारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मतभेदामुळे विभक्त राहणाऱ्या पत्नीला दैनंदिन खर्चासह स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पुणे कौटुंबिक न्यायालयाने पतीला दिला. ही रक्कम पत्नीच्या शिक्षणासह तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे न्यायाधीश आर. एन. खान यांनी निकालपत्रात नमूद केले.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कौटुंबिक वाद आणि एकमेकांशी पटत नसल्याने संबंधित पती-पत्नी विभक्त राहतात. पत्नी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून, तिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. पुण्यासारख्या शहरात राहण्याचा खर्च, अभ्यासासाठी लागणारी महागडी पुस्तके, क्लासेसची फी आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करणे तिला कठीण जात होते. पतीकडून पुरेशी आर्थिक मदत मिळत नसल्याने तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

    पत्नीच्या वतीने ॲड. सोनाली आरू-नवस्कर, ॲड. प्राची जमदाडे-कोल्हे, ॲड. अजय मोहेळ आणि दीपाली अडसूळ यांनी बाजू मांडली. ‘पत्नी सुशिक्षित असली तरी सध्या ती केवळ परीक्षेची तयारी करीत आहे. तिला स्वतःचे करिअर घडवण्यासाठी आर्थिक स्थैर्याची गरज आहे,’ असा युक्तिवाद वकिलांनी केला.

    दुसरीकडे, पतीचे उत्पन्न आणि त्याची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन न्यायालयाने दोन्ही बाजू तपासून पाहिल्या. पत्नीची शैक्षणिक ओढ आणि सध्याची परिस्थिती पाहता, तिला सन्मानाने जगण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी ३० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. वैयक्तिक वादामुळे एखाद्या महिलेचे शिक्षण किंवा करिअर थांबू नये, या दृष्टीने न्यायालयाने दिलेला हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे. न्यायालयाने पतीला या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा