PNP Boat Service: एकीकडे राज्यसरकार कोकणात जल प्रवासाला पाठबळ देत असताना मोठी प्रवासी संख्या असलेल्या गेटवे-मांडवा मार्गावर प्रवाशांची लूट सुरू आहे. मेरिटाइम बोर्डाकडून प्रवाशांचे हित जपण्याऐवजी बोट कंपनीच्या व्यवहारांना पाठीशी घातले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: गेट वे ऑफ इंडिया आणि मांडवा या दरम्यानच्या फेरीप्रवासात प्रवाशांची पहिली पसंती ठरलेल्या ‘पीएनपी’ बोटसेवेत गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती, ऑनलाइन पेमेंटला नकार, तसेच वातानुकूलित आणि खुल्या अप्पर डेकसाठी समान दर आकारणी यांमुळे प्रवाशांत तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांकडे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगली आहे.
नेटवर्क असूनही रोख व्यवहार
नियमित आणि वातानुकूलित सेवेमुळे प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या पीएनपीच्या बोटसेवेमध्ये मांडवा येथील सर्व व्यवहार रोखीने चालतो. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात नाही. समुद्रात नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे कारण देत ऑनलाइन पेमेंट घेतले जात नाही. मांडवा जेट्टीवर सर्व कंपन्यांचे नेटवर्क चालत असून, तेथे तिकिटाचे शुल्क घेऊन प्रवाशांना बोटीमध्ये प्रवेश देणे शक्य असतानाही तसे केले जात नाही. यामुळे संशय व्यक्त होत आहे.Mumbai Melody Road: ‘मेलडी रोड’च्या निर्णयावर महापालिकेचा यू-टर्न; फक्त रात्री बॅरिकेड्स, दिवसभर नियमित वाहतूक सुरू
अनेकदा या बोटीमधील वातानुकूलित आसने भरल्यानंतर, बोटीच्या वरच्या मोकळ्या डेकवर प्रवाशांना बसायला दिले जाते. मात्र एसी आणि अप्पर डेकसाठी समान भाडे आकारले जाते. इतर कंपन्यांच्या बोटींमध्ये खुल्या अपर डेकचे भाडे वातानुकूलित कक्षापेक्षा कमी आकारले जात असताना, पीएनपीकडून ही वसुली सुरू आहे. मात्र सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालय गाठण्याच्या गडबडीत असलेल्या नडलेल्या प्रवाशांची व्यवस्थापन लूट करीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मेरिटाइम बोर्डाकडून काणाडोळा
गेटवे-मांडवा दरम्यान चालणाऱ्या फेरी बोटींवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे नियंत्रण असते. प्रवासी भाडे निश्चितीही त्यांच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणात असते. पीएनपी बोट व्यवस्थापनाकडून मात्र नियम धुडकावून मोकळ्या अप्पर डेकसाठी वाढीव भाडे आकारण्यात येत आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा अंदाज, मुंबई, पालघर, ठाण्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस; कोकणात ‘यलो अलर्ट’
अप्पर डेकच्या तिकिटांवर केवळ तारीख लिहून दिली जाते. त्यामुळे प्रवाशांकडून वसूल केल्या जाणाऱ्या तिकीट शुल्काबाबतही संशय आहे. मेरिटाइम बोर्ड मात्र या व्यवहारावर काणाडोळा करत असल्याचे दिसून येते. यामागे बोट व्यवस्थापन व मेरिटाइम बोर्डाचा अर्थपूर्ण संवाद असल्याचे बोलले जात आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा