Haunted School: डोमा आश्रमशाळेतील वसतिगृहाच्या आवारातच भूमकाकडून विद्यार्थिनीवर मंत्रोपचार व पूजाअर्चा करण्यात आली.
एका विद्यार्थिनीचे पालक व नातेवाइक तिला थेट वसतिगृहात घेऊन आले आणि भूमकाकडून तिची पूजा केली. तिच्या अंगावरून कापूर ओवाळण्यात आला, मंत्रोच्चार करण्यात आले, तसेच तिच्या कानात मंत्र पुटपुटण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता अंधश्रद्धेचे गंभीर वळण मिळाले आहे. ही पूजा सुरू असतानाही सदर विद्यार्थिनी हुंदके देत मोठ्याने रडत असल्याचे दिसून आले.
Pune Crime : वडापावच्या गाडीवर वाद, छातीत बुक्क्या मारल्या, घरी येऊन झोपलेल्या तरुणाचा मृत्यू, पुण्यात हळहळविद्यार्थिनींमध्ये नेमकी कोणती लक्षणे दिसत आहेत, त्यामागे मानसिक, शारीरिक किंवा अन्य कोणते कारण आहे, याचा शास्त्रीय तपास होणे अपेक्षित होते. मात्र, घटनेला काही दिवस उलटूनही प्रशासनाकडून त्याबाबत ठोस माहिती किंवा अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. परिणामी, संशय आणि भीतीच्या वातावरणात अंधश्रद्धेला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, वसतिगृहातून घरी परतलेले बहुतांश विद्यार्थी अद्याप शाळेत परतलेले नाहीत. गावातील काही मोजके विद्यार्थी मात्र शाळेत येऊ लागले आहेत. घरी परतलेल्या काही विद्यार्थिनी अद्याप या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेल्या नसल्याचे समजते. त्यांच्यात पूर्वीप्रमाणेच काही लक्षणे दिसत असल्याची माहितीही पुढे येत आहे.
या प्रकरणाचे वस्तुनिष्ठ सत्य समोर आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस) पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, अद्याप अंनिसचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचलेले नाहीत.
Raigad News : पोरींनो मानलं तुम्हाला! विद्यार्थिनी रस्त्यावर उतरत जेव्हा रिपोर्टर होतात, धाडसाचं सर्वत्र कौतुकतर दुसरीकडे, धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील ‘कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था’ संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. या दुर्दैवी घटनेत उपचारादरम्यान सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनू गजुराम कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) व कविता राजकुमार किरंगा (१२) या तिघींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
