Badlapur Flyover: बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवा पूल बांधण्याची योजना आहे. या पुलामुळे बदलापूर पूर्व-पश्चिम जोडणीला गती मिळणार आहे. एमएमआरडीएने यासाठी निविदा मागवल्या असून सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, बदलापूर: बदलापूर शहरातील वाढत्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एका उड्डाणपुलाची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बॅरेज रस्ता ते होप इंडिया या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
कसा असेल मार्ग?
प्रस्तावित उड्डाणपूल बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रस्त्यापासून सुरू होऊन कल्याण-कर्जत रेल्वेमार्ग ओलांडून पूर्वेकडील औद्योगिक परिसरातील होप पॉवर हाऊसजवळ उतरणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सुलभ होणार असून, स्थानक परिसरातील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.सध्या बदलापुरात पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी केवळ एकच उड्डाणपूल आहे. त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक मध्यवर्ती भागातूनच वळवावी लागते. परिणामी, वारंवार कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यास परिस्थिती अधिकच बिकट होते.
Mumbai Local: रात्री परतीच्या प्रवासात मुंबईकरांची रखडपट्टी, CSMT-कुर्ला, ठाणे अनेक फेऱ्या रद्द; शेवटच्या लोकलमध्येही बदल
दरम्यान, बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळा या दरम्यान दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम प्रक्रियेत आहे. मात्र, शहराच्या इतर भागांतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बॅरेज रस्ता ते होप इंडिया हानवीन उड्डाणपूल अत्यावश्यक मानला जात आहे. या नव्या प्रकल्पामुळे रमेशवाडी, रितू वर्ल्ड ते खरवई या भागांदरम्यानचा सध्या चार ते पाच किलोमीटरचा वळसा कमी होऊन प्रवास वेळेत पूर्ण होईल. तसेच बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीही लक्षणीयरीत्या घटेल. यामुळे इंधन, वेळ आणि श्रम यांची बचत होणार आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे बदलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai Melody Road: ‘मेलडी रोड’च्या निर्णयावर महापालिकेचा यू-टर्न; फक्त रात्री बॅरिकेड्स, दिवसभर नियमित वाहतूक सुरू
सहा महिन्यांत हा अहवाल सादर करण्याचे उद्दिष्ट
एमएमआरडीएनेमागवलेल्या निविदेत व्यवहार्यता अभ्यास, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे तसेच निविदा प्रक्रिया व्यवस्थापन यांचा समावेश आहे. पुढील ४० वर्षांचा वाहतूक अंदाज, सर्वेक्षण, भूसंपादन, पुनर्वसन, तसेच प्रकल्पग्रस्तांशी समन्वय अशा विविध बाबींचा या अहवालात समावेश अपेक्षित आहे. सहा महिन्यांत हा अहवाल सादर करण्याचे उद्दिष्ट आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा