Parth Pawar Meets Raj Thackeray : पार्थ पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवतीर्थ निवासस्थानी पार्थ पवारांनी ही भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीय.
राज ठाकरे पार्थ पवार शिवतीर्थ भेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे (दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गट) नेते पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. तब्बल एक ते दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, ही भेट कशासंदर्भात किंवा भेटीचं नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप मिळालेली नाहीय. पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून त्यामागे अनेक महत्त्वाचे राजकीय संदर्भ असल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अजितदादा-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील पोस्टरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो नसल्याचं काल रविवारी समोर आलं. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आल्यानंतर काल रविवारी रात्री अदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरवू नये’, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. Ashok Kharat: खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सरकारकडून उत्तर
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा
रायगड मतदारसंघातील नवनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठीच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोंना स्थान देण्यात आले होते. या बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिवगंत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधकांसह राष्ट्रवादीच्या इतर काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तटकरे कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. अखेर, रविवारी रात्री उशिरा अदिती यांनी एक्सवर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. Ashok Kharat Nashik: ऑफिस बॉय नीरज जाधव माझ्याकडे स्वत:हून आला नाही; समोरासमोर चौकशीदरम्यान अशोक खरातचा वेगळाच दावा दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भूकंप होण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे. आता ही भेट कशासाठी होती हे स्वत: राज ठाकरे यांनी किंवा पार्थ पवार यांनी सांगिल्यानंतर कळणार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा