Neeraj Jadhav: आपल्याकडे कामाला असलेल्या नीरज जाधवच्या मागे खरातने आता ‘कट’ असल्याचा संशय व्यक्त केल्याने यामागे वेगळी शक्ती कार्यरत होती का? याचा तपास एसआयटीला करावा लागणार आहे.
अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महिला अत्याचार प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून चौकशीतून खरातचे कारनामे उघड होत आहेत. याप्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पोलीस तपास पथकाकडून अशोक खरात आणि त्याच्याकडे ऑफिस बॉय म्हणून नोकरी केलेल्या नीरज जाधव या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून, यावेळी खरात याने नीरज जाधव याच्याबाबत खळबळजनक दावा केला असल्याचे समजते. खरातने केलेल्या या नव्या दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला आणखी वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात सध्या चर्चेत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणात SIT कडून कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषण, फसवणुकीचे गुन्हे, खरात याची मालमत्ता अशा अनेक बाबींचा तपास सध्या SIT करत आहे. या अनुषंगाने मुख्य संशयित अशोक खरात आणि ऑफिस बॉय नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती आहे. यावेळी खरात याने चौकशी दरम्यान खळबळजनक दावा केला. “नीरज जाधवला कोणीतरी पूर्वनियोजित कट रचून माझ्याकडे ऑफिस बॉय म्हणून पाठवले आहे. तो स्वतःहून आलेला नाही,” असा दावा अशोक खरातने पोलीस अधिकाऱ्यांसमोर केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरातच्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीरज जाधव हा एका वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून खरातच्या कार्यालयात अत्यंत कमी पगारावर कामाला लागला होता. सन २०१९ ते २०२४ या काळात नीरज जाधव हा खरात याच्याकडे कामाला होता.
अशोक खरात प्रकरणातील सर्व बाबी पाहता त्याला कोणीही या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, असे दिसत नसून, खरात प्रकरणाची आणि इतर देखील भोंदूबाबा यांची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यात उडी घेतली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खरातचा हा दावा म्हणजे बनाव असल्याचं म्हटलं आहे. तपासाची दिशा भरकटवण्यासाठीच खरातने हा बनाव रचला असावा, असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. “नीरज जाधवच्या आधी येथे काम करणाऱ्या १० ऑफिस बॉयनी काम का सोडले?” असा सवाल उपस्थित करत, त्या सर्व जुन्या १० कर्मचाऱ्यांची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी अंनिसने लावून धरली आहे.
दरम्यान, आता एसआयटी चौकशी दरम्यान खरात याने नीरज जाधव याच्याबाबत केलेल्या या खळबळजनक दाव्याचा SIT कडून तपास केला जातो का? आणि जाधवने अशोक खरातकडे काम करण्यामागे खरंच पूर्व नियोजित कट होता का? हे देखील बघणे महत्त्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा