Nashik Father Daughter Death : हर्षल यांची दुसरी पत्नी, एक वर्षाचा मुलगा, मयत मुलगी या चौघांचाही आनंदात संसार सुरू असताना मुलगी काही महिन्यांपासून जुन्या कौटुंबिक घटनांमुळे नैराश्यात होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर नियतीने असा काही क्रूर घाला घातला की, तो ऐकून भल्याभल्यांच्या काळजाचे पाणी व्हावे. अवघ्या चौदा वर्षांच्या मुलीने रविवारी (दि. २६) गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची नाशिकमधील धक्कादायक घटना ताजी असतानाच, तिच्या विरहाचे दु:ख सहन न करू शकलेल्या वडिलांनीही बुधवारी (दि. २९) पहाटे तीन वाजता गळफास घेत जगाचा कायमचा निरोप घेतला. मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर तिसरा दिवस उजाडण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसर सुन्न झाला आहे.
मुलीच्या पार्थिवावर अंत्यविधी
कामटवाडे परिसरातीलवावरेनगरातील एका रो-हाउसमध्ये रविवारी (दि. २६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास १४ वर्षीय मुलीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलीने वैयक्तिक नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते. तिच्या पार्थिवावर सोमवारी (दि. २७) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. Crime News : संबंध ठेवण्यास टाळाटाळ, वहिनीने ‘जाऊबाईं’ना दाढी करताना पकडलं, लग्नाच्या 25 दिवसांनी बायको ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा रविवारी रात्री तिच्या मृत्यूची घटना उघड झाल्यापासून तिचे वडील हर्षल बाजीराव आणेराव (वय ४३, मूळ रा. सिन्नर) हे अत्यंत दुःखात आणि मानसिक तणावात होते. त्यातच बुधवारी (दि. २९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हर्षल यांनी रो-हाउसमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. त्यांचे चुलत जावई विक्रांत गिते यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
हर्षल हे कुरिअर व्यवसायाद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर घटस्फोट झाला होता. तेव्हापासून मुलगी हर्षल यांच्यासमवेत वास्तव्यास होती. हर्षल यांची दुसरी पत्नी, एक वर्षाचा मुलगा, मयत मुलगी या चौघांचाही आनंदात संसार सुरू होता. मात्र, मुलगी काही महिन्यांपासून जुन्या कौटुंबिक घटनांमुळे नैराश्यात होती. Crime News : मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा जीव घेतला, किचनमध्ये बॉडी टाकून अपघात भासवला, एका क्लूने पुरता अडकला
मेहुण्याला ‘व्हॉट्सॲप’वर हिशोब पाठवला
तिने त्यातून जीव दिल्याचा संशय असताना मुलीच्या विरहातून हर्षल यांनी जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. हर्षल यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांच्या मेहुण्याला ‘व्हॉट्सॲप’वर भाजीपाला, किराणा व अतिशय किरकोळ उधारीचा हिशेब मेसेजद्वारे पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा