• Mon. Sep 7th, 2026

खरातला भेटणाऱ्या 39 आमदारांची यादी जाहीर करा, विजय वडेट्टीवारांचे दीपक केसरकरांना आवाहन

खरातला भेटणाऱ्या  39 आमदारांची यादी जाहीर करा, विजय वडेट्टीवारांचे दीपक केसरकरांना आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड हादरे बसलेयत. त्यातच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. खरातला ३९ आमदार भेटले असताना फक्त माझंच नाव का घेतलं जातंय असं केसरकर यांनी म्हटलं होतं. तर केसरकरांनी म्हटल्याप्रमाणे ते ३९ आमदार नक्की कोण असा प्रश्न उपस्थित झालाय. यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केसरकरांनी 39 आमदारांची यादी जाहीर करावी, असं म्हटलंय. तसंच खरातच्या कारनाम्यांचा पेनड्राइव्ह उघड केला तर महाराष्ट्र सरकारला हादरा बसेल असेही वडेट्टीवार म्हणाले. शिवाय मोठ्या माशांना वाचवण्यासाठी खरातचं बरंवाईट करून पुरावे नष्ट करण्यात येतील अशी भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed