छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण १२ एलपीजी गॅस पंप आहेत, मात्र त्यापैकी केवळ चारच पंप सुरू होते. दुर्दैवाने कालपासून ते देखील बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या हजारो रिक्षाचालकांचे अतोनात नुकसान होत आहे. गॅस मिळत नसल्याने रिक्षा रस्त्यावर उभ्या आहेत, परिणामी रिक्षाचालकांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन गॅस पंपांवरील वाढते दर आणि ब्लॅक मार्केटिंगबाबत तक्रार केली. यावर संजय शिरसाट यांनी तत्काळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना फोन लावून कडक शब्दांत सूचना दिल्या