सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला चैत्र एकादशीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या इको कारने ट्रकला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत.
चैत्र एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी कुटुंबाच्या कारचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : भक्तीचा मार्ग कधी असा काळ बनून येईल, याची पुसटशी कल्पनाही त्या वारकऱ्यांनी केली नसेल. चैत्र एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी निघालेल्या एका वारकरी कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला. टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या भाविकांच्या गाडीला उमदीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
नेमकी घटना काय?
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथील काही भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले होते. रविवारी ही भाविक मंडळी इको कारने (MH 10) प्रवासाला निघाली होती. मात्र, उमदी गावाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील कार समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
चालकाचा मृत्यू, महिलांवर उपचार सुरू
या अपघातात कार चालक सांगांपा नाव्ही (रा. माडग्याळ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कारमध्ये चालकासह सहा महिला प्रवासी प्रवास करत होत्या. या अपघातात सर्व सहाही महिला जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले.
जखमी महिलांची प्रकृती लक्षात घेता, त्यांना तातडीने सोलापूर येथील सीएनएस (CNS) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काही महिलांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. उमदी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संख आणि माडग्याळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या विठूरायाच्या दर्शनासाठी हे भाविक आनंदाने घराबाहेर पडले होते, त्यांच्यावरच हा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा