• Mon. Jun 15th, 2026

    Pune University: पुणे विद्यापीठात तरुणींसमोर ‘डिलिव्हरी बॉय’चं विचित्र वर्तन; परदेशी विद्यार्थिनीची तक्रार, घटनेनं शहरात संताप

    Pune University: पुणे विद्यापीठात तरुणींसमोर ‘डिलिव्हरी बॉय’चं विचित्र वर्तन; परदेशी विद्यार्थिनीची तक्रार, घटनेनं शहरात संताप

    Pune Crime: या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

    पुणे विद्यापीठात तरुणींसमोर ‘डिलिव्हरी बॉय’चं विचित्र वर्तन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परदेशी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात एका ‘डिलिव्हरी बॉय’कडून विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती शनिवारी अधिसभेत समोर आली.

    तक्रार न करण्यासाठी दबाव

    संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी संवाद साधताना, पोलिसांत तक्रार दाखल न करण्यासाठी पुणे विद्यापीठातील व्यक्तींनी आपल्यावर दबाव टाकल्याचे सांगितले. या प्रकारावरून सदस्य राहुल पाखरे, कृष्णा भंडलकर, सचिन गोरडे पाटील, ईशानी जोशी, अपर्णा लळिंगकर, अद्वैत बंबोली, शंतनू लामधाडे आदींनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र टीका केली. आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली.

    ‘सीसीटीव्ही’च नाहीत

    विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे. यात ४५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी आणि ८५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी याची निवासाची सोय आहे; परंतु भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाल्यानंतरच प्रवेश द्यावा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना काही अनुदान देण्यात येते. याअंतर्गत विद्यापीठात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्राध्यापकांच्या निवासस्थानी असलेल्या इमारतीत काही परदेशी विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक अशा कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याची बाब अधिसभेसमोर आली.

    ‘तक्रार दाखल’ची सूचना

    विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी बॉय ऑर्डर दिलेली वस्तू देण्यासाठी आला असताना त्याने अश्लील वर्तन केले. त्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षारक्षकांना माहिती दिली. मात्र, पोलिसांत तक्रार नोंदवू नये; म्हणून दबाव आणून लेखी निवेदन घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त सदस्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसंच तक्रार दाखल करण्याबाबत कुलगुरुंकडून सूचना करण्यात आली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा