Nashik Phata-Khed Elevated Road: पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी नाशिक फाटा ते खेडदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग 30 किमी लांब असून यामुळे पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, भोसरी, मोशीपर्यंत जोडणीर मिळणार आहे.
म.टा. प्रतिनिधी, पिंपरी: पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगर (खेड) या दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉर
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबवला जात असून, यासाठी सात हजार ८२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी इंटरप्राइजेस, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि ‘प्रकाश एसफाल्टिंग अँड टोल हायवेज इंडिया’ या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.Twin Tunnels: ‘ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह’ दुहेरी बोगद्यांच्या कामाला वेग, पहिल्यांदाच रेल्वे आणि भुयारी मेट्रोखालून जाणार मार्ग
या प्रकल्पासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेषतः भोसरी ते मोशी इंद्रायणी नदी यादरम्यानच्या भू-संपादनातील अडचणी, एफएसआय व टीडीआरच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे; तसेच निधीबाबतचे प्रश्न याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
कसा असेल मार्ग?
या प्रकल्पांतर्गत ‘सिंगल पिलर’वर उभारण्यात येणारा आठ पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर, सध्याच्या महामार्गाचे चार किंवा सहा पदरी रुंदीकरण, एकूण ३० किलोमीटर लांबी; तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडची उभारणी ही प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणार आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि चाकणसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांशी खेडमार्गे वेगवान व सुरक्षित संपर्क होऊ शकणार आहे.
Mumbai News: LBS, अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील कोंडी फुटणार; चार पदरी उड्डाणपुलामुळे प्रवास सोपा; कुर्ला ते घाटकोपर जोडणार
“नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील अनेक नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती समाधानकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत,” अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा