Automatic Door Local: मुंबईतील उपनगरिय रेल्वे सेवा सुधारण्यासाठी अनेक मागण्या खासदार नरेश म्हस्केंनी केंद्रीय समितीपुढे मांडल्या. यावेळी या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : खासदार नरेश म्हस्के यांच्यासह केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक झाली असून यावेळी त्यांनी समितीपुढे मुंबईतील उपनगरिय रेल्वे सेवेच्या विस्तारासाठी आणि सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मुंबई-ठाणे लोकल गाड्यांचे लवकरात लवकर 15 डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतर करावेस तसेच सर्व लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजा बंद होणारी प्रणाली लागू करावी अशा मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. याशिवाय स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशीही मागणी त्यांनी या सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
शुक्रवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या तांत्रित सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के आणि संजय दिना पाटील हे उपस्थित होते. नवी दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतला असून काही मुद्दांवर चर्चा झाल्या.
Twin Tunnels: ‘ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह’ दुहेरी बोगद्यांच्या कामाला वेग, पहिल्यांदाच रेल्वे आणि भुयारी मेट्रोखालून जाणार मार्ग
लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू
मुंबई उपनगरिय रेल्वे सेवेच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी लोकलमधून पडून हजारो नागरिकांचा मृत्यू होतो. सध्या 15 डब्यांची लोकल संख्या खपू कमी आहे. 12 डब्यांच्या लोकलमध्ये ट्रेनच्या क्षमतेहून 4 पट अधिक प्रवासी प्रवास करतात. पीक अव्हरवेळी लोकल ट्रेनमध्ये प्रवासी लटकून प्रवास करतात. यावेळी लोकलमधून पडून अनेकदा प्रवासी गंभीररित्या जखमी होतात तर काहींचा मृत्यूही होतो. या सर्व समस्या म्हस्केंनी या बैठकीत रेल्वे मंत्र्यांसमोर मांडल्या.
मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याचं काम सुरू आहे. हे वेगाने पूर्ण करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. तसेच, 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्याचही काम सुरू आहे. परंतु, ते संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत असून कामाचा वेग वाढवण्याच्याही त्यांनी यावेळी सूचना दिल्या. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवर स्वयंचलित बंद दरवाजांची प्रणाली असलेल्या लोकल सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्याही लवकरात लवकर विकसित करून सुरू कराव्या अशी मागणी त्यांनी केली.
Mumbai News: LBS, अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील कोंडी फुटणार; चार पदरी उड्डाणपुलामुळे प्रवास सोपा; कुर्ला ते घाटकोपर जोडणार
रेल्वे स्थानकांच्या विकासाची मागणी
मुंबईतील रेल्वे सेवांसह ठाणे लोकसभा मतदार संघातील समस्याही त्यांनी यावेळी अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान, बेलापूरदरम्यान रेल्वे स्थानकांवर विकासकामं रखडली आहेत. सिडको आणि रेल्वेमधील समन्वयाच्या आभावामुळे स्थानकांवर काम होत नसून यामध्ये लक्ष घालण्याची त्यांनी मागणी केली. यानंतर रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन बेलापूरदरम्यान रेल्वे स्थानकांवर विकास कामांना सुरूवात करण्याचेन निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, ठाणे, वाशी आणि मुंबई उपनगरातील अनेक रेल्वे स्थानकांवरील समस्या यावेळी त्यांनी समितीसमोर मांडल्या.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा