• Sun. Jun 14th, 2026
    पश्चिम रेल्वेवर खोळंबा! कांदिवली- बोरिवलीदरम्यान दोन दिवसांचा विशेष ब्लॉक, 299 लोकल फेऱ्या रद्द

    Mumbai Local Mega Block Update: प्रवाशांच्या सोईसाठी पश्चिम रेल्वेकडून २५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बोरिवलीतील फलाट-१ आणि २वरून लोकल उपलब्ध राहणार नाही.

    पश्चिम रेल्वेवर ब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी प्रवास करताना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान असलेल्या पूल क्रमांक-६१च्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्रीनंतर २० तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे शनिवारी ४५ आणि रविवारी २५४ अशा एकूण २९९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. धीम्या मार्गावरील उर्वरित अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावरून धावणार आहेत.

    ब्लॉकवेळेत कांदिवली ते मालाडदरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट स्लॅब बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कांदिवलीजवळ डेक स्पॅनउभारणीसाठी गर्डर टाकण्याचेही काम करण्यात येणार आहे. यासाठी शनिवार, २८ मार्चला रात्री १०.३० ते २९ मार्च सायंकाळी ७.३०पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉकवेळेत कांदिवली ते बोरिवलीदरम्यानच्या सर्व लोकल गाड्या गोरेगाव–बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही लोकल अंधेरी ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील. यामुळे राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर डाऊन दिशेच्या गाड्या थांबणार नाहीत.

    Maharashtra TimesMelghat Malnutrition: कुपोषण ही शोकांतिका! माता-बालमृत्यूंबाबत उच्च न्यायालयाकडून तीव्र खेद व्यक्त
    काही लोकल फेऱ्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकात रद्द करून तेथूनच परतीसाठी पाठवल्या जातील. सर्व १५ डब्यांच्या धीम्या गाड्या अंधेरी–बोरिवलीदरम्यान दोन्ही दिशांनी जलद गाड्या म्हणून चालवण्यात येतील.

    मध्य, ट्रान्स हार्बरवर रविवारी ब्लॉक
    मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. या कालावधीत रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, लोकल विलंबाने धावणार आहेत.

    Maharashtra TimesNarhari Zirwal: झिरवाळांनी व्हिडिओबद्दल स्वतःच CM ना फोन केलेला, काय-काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
    मध्य रेल्वे

    स्थानक : माटुंगा ते मुलुंड
    मार्ग : अप आणि डाऊन धीमा
    वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५पर्यंत
    परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावतील.

    ट्रान्स हार्बर
    स्थानक : ठाणे ते वाशी/नेरुळ
    मार्ग : अप आणि डाऊन
    वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
    परिणाम : ब्लॉकवेळेत ठाणे ते वाशी/नेरुळ आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि पनवेल गाड्यांसह खारकोपर-उरण मार्गावरील लोकल वेळापत्रकानुसार उपलब्ध राहणार आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा