Railway Station Announcement: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या नेमक्या कोणत्या स्थानकांवर थांबणार आहेत याबद्दल संभ्रम असल्यामुळे अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतात. तसेच स्थानकाजवळ गाडी धीमी झाल्यामुळे ट्रेन थांबणार आहे असे वाटते. असे अपघात रोखण्यासाठी या घोषणा होणे महत्त्वाचे आहे.
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘मुंबई लोकलमध्ये रेल्वे स्थानकांविषयीची उद्घोषणा होते किंवा फलकावर येणारे स्थानक दर्शवले जाते. तशाप्रकारे सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पुढील थांब्याविषयी उद्घोषणा व्हायला हवी. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाईल आणि धावत्या रेल्वेगाडीतून उतरण्याचे आणि जीव धोक्यात घालण्याचे प्रवाशांचे प्रकार कमी होतील’, अशी महत्त्वाची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला केली आहे.
धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न
‘लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून अनेक प्रवासी हे कमी अंतरावरील आपल्या इच्छितस्थळी पोचण्यासाठीही प्रवास करतात. ती रेल्वे कोणत्या स्थानकात थांबणार आहे, याची उद्घोषणा होत नसेल तर काही वेळा प्रवासी घाबरून चुकीचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, त्याच क्षणी मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे असते. एखादा प्रवासी घाबरून मानसिक संतुलन गमावतो आणि स्वतःला इजा करण्याची इच्छा नसताना तो धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक स्वतःला इजा करण्याचा कोणाचा हेतू नसतो. त्यामुळे अशावेळी प्रवाशाला दोष देता येणार नाही. म्हणून सामाजिक हिताच्या दृष्टीने रेल्वेत पुढील थांब्याविषयी उद्घोषणा होणे आवश्यक आहे. वंदे भारतमध्ये अशी उद्घोषणा प्रणाली आहे. तशीच सुविधा सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत व्हायला हवी’, असे निरीक्षण न्या. जितेंद्र जैन यांनी रोहिदास कुमावत यांच्या अपिलावरील निर्णयात नोंदवले.Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या मार्गावर 25 पैकी 17 नदीपूल तयार, ‘बीकेसी’मध्ये भूमिगत स्थानकाचं काम सुरू; कसा असेल मार्ग?
अपघात थांबवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
सुमारे दहा वर्षांपूर्वी कुमावत हे मनमाडहून जळगावकडे ‘गुवाहाटी एक्सप्रेस’ने प्रवास करत होते. गाडी जळगाव स्थानकाजवळ पोहोचत असताना गर्दीमुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पायांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे अपघात न्यायाधिकरणात दावा केला होता. मात्र, ‘कुमावत यांना अपघातामुळे जखम झाली नसून त्यांनी स्वत:हून केलेल्या कृतीमुळे झालेली आहे. ते डब्याच्या दरवाजाजवळ बसले हेाते आणि गाडी जळगावला थांबणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला असता, ते पडले’, असा निष्कर्ष नोंदवत न्यायाधिकरणाने सन २०१८मध्ये त्यांचा दावा फेटाळला होता. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते.
Navi Mumbai Airport: उन्हाळी हंगामासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज! ‘नेटवर्क कनेकटीव्हीटी’ होणार सुरू; 30 नव्या मार्गांवर उड्डाणे
‘कुमावत हे वैध प्रवासी होते आणि जळगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर सर्व गाड्या थांबतात, या समजुतीत त्यांनी प्रवास केला होता. गाडी जळगावला थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर एखादा व्यक्ती धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दुखापत होणे स्वाभाविक आहे’, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द केला. अखेरीस उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला १२ आठवड्यांच्या आत कुमावत यांना ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देऊन त्यांचे अपिल निकाली काढले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा