सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कर्मचाऱ्यांवर सकाळी ९ ते थेट रात्री १२ वाजेपर्यंत कामाची सक्ती केली जात असून, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. या कारभाराविरोधात सर्व २९ कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे लेखी तक्रारपत्र थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेत तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषकांची अनेक पदे आधीपासूनच रिक्त आहेत. असे असतानाही सहसंचालक तुकाराम मुंढे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा क्षमता न वाढवता अचानक प्रयोगशाळेत ‘दोन शिफ्ट’मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणारे काम रात्री १२ वाजेपर्यंत चालत असल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण येत आहे. वाढलेल्या कामाच्या मोबदल्यात कोणतेही अतिरिक्त भत्ते किंवा सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
औषधांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती
प्रयोगशाळेत अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे शेकडो प्रलंबित नमुने पडून आहेत. हे प्रलंबित नमुने घाईगडबडीत निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सतत दबाव आणला जात आहे. मात्र, भारतीय औषध संहिता , ब्रिटिश आणि यूएसपी या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नमुन्यांच्या अचूक चाचणीसाठी ठराविक वेळेची गरज असते. नियमानुसार एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुनेच तपासले जाऊ शकतात. मात्र, सहसंचालकांच्या घाईगडबडीमुळे आणि दबावामुळे नमुन्यांच्या विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची आणि त्याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होण्याची गंभीर भीती कर्मचाऱ्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
दोन शिफ्टचा निर्णय रद्द करण्याची आक्रमक मागणी
सतत बदलणाऱ्या आदेशांमुळे आणि कार्यालयीन वेळेच्या अनिश्चिततेमुळे प्रयोगशाळेतील वातावरणात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हा दोन शिफ्टचा निर्णय तातडीने मागे घेऊन पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी, अशी मुख्य मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि मनुष्यबळ वाढवल्याशिवाय असा कोणताही निर्णय लागू करू नये, अशी विनंतीही मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा