• Tue. Sep 8th, 2026

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसमवेत भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 27, 2026
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसमवेत भेट – महासंवाद

नवी दिल्ली दि. २७–  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी या दौऱ्यात विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या.

राज्यपालांनी आज सर्वप्रथम राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही एक औपचारिक सदिच्छा भेट होती. त्यानंतर राज्यपालांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची संसद कार्यालयात  भेट घेतली.  या भेटीत राज्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed