• Mon. Jun 15th, 2026

    बुलेट ट्रेनच्या मार्गावर 25 पैकी 17 नदीपूल तयार, ‘बीकेसी’मध्ये भूमिगत स्थानकाचं काम सुरू; कसा असेल मार्ग?

    बुलेट ट्रेनच्या मार्गावर 25 पैकी 17 नदीपूल तयार, ‘बीकेसी’मध्ये भूमिगत स्थानकाचं काम सुरू; कसा असेल मार्ग?

    Bullet Train Station: मुंबई-अहमबाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नद्या, डोंगर आणि खाडीखालून मार्ग तयार केले जात आहेत. एकूण 25 नद्यांवर पूल उभारणीचं काम सुरू असून त्यापैकी 17 पुलांचं काम पूर्ण झालं आहे.

    मुंबई: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील मार्गिकांचे बांधकाम बहुतेक ठिकाणी पूर्ण झाले आहे किंवा प्रगतीपथावर सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी स्थानकं उभारणीचं काम शिल्लक आहे. या संपूर्ण मार्गात एकूण 25 नद्यांवर पूल उभारले आहेत. यापैकी 17 पुलांचं काम झालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली आहे.

    कुठे आहेत नदीपूल?

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किमी लांब आहे. यापैकी गुजरातमधील बहुतेक पुलांचं बांधकाम पूर्ण झालं आहे. मेशवा नदीवर 120 मीटर लांब पूल, वतराक नदीवर 280 मीटर, मोहर नदीवर 160 मीटर, कावेरीवर 120 मीटर तर दमण गंगा नदीवर सर्वात लांब 360 मीटर पुलासह एकूण 17 पुलांचं बांधकाम झालं आहे. राज्यातील प्रमुख नद्या ओलांडून या बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येत आहे.Maharashtra TimesMumbai Melody Road: मुंबईतील ‘म्युझिकल रोड’वर फुल स्टॉप! आठवड्यातील 3 दिवस बंद राहणार मार्ग; 6 कोटींच्या प्रयोगाला स्थानिकांचा विरोध

    गुजरातमधील साबरमती नदीवर 480 मीटर पूल बांधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान माही नदीवर 720 मीटर लांब पूल तयार करणार असून 12 पैकी 11 विहिरींचं काम पूर्ण झालं आहे. तसेच, नर्मदा नदीवर 1366 मीटर पूल उभारण्यात येणार असून 25 पैकी 21 विहिरी पूर्ण झालं आहे. दरम्यान, वैतरणा नदीवर सर्वात लांब 2 किमीचा पूल उभारण्यात येणार आहे.

    बीकेसी स्थानकावर किती काम शिल्लक?

    दरम्यान, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे 4 रेल्वे स्थानकं असणार आहेत. यापैकी मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुलात स्थानकाचं काम सुरू आहे. इथे भूमिगत रेल्वे स्थानक तयार करणार असून स्थानकाचा पाया रचला गेला आहे. दरम्यान, गुजरातमध्ये साबरमती स्थानकावर छत बांधण्याचं काम सुरू असून अहमदाबाद स्थानकावरही काम वेगाने सुरू आहे.

    Maharashtra TimesGoregaon-Magathane Road: गोरेगाव ते मागाठाणे प्रवास 10 मिनिटांत! कोस्टल रोड-लिंक रोड जोडणारा 5.5 किमी लांब मार्ग; पालिकेचा नवा प्रकल्प

    या 508 किमी मार्गावर साबरमती, अहमदाबाद, आनंद, बडोदा, भारूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोइसर, विरार, ठाणे, वांद्रे-कुर्ला संकुल या स्थानकांचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान, वांद्रे ते शिळफाटा भुयारी मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. यामध्ये घणसोली ते शिळफाटा मार्गावर नदीखालून बोगदा जाणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा