Kolhapur News: जिल्हा प्रशासनाने आवाहन जारी केल्यापासून सोशल मीडियावर अफवा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना संयम राखण्याचे आणि चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Petrol and Diesel(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत सर्व नागरिकांसह प्रसारमाध्यमे, डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा सर्वांनाच स्पष्ट आवाहन जारी करून अफवा पसरवू नये आणि अधिकृत माहितीच प्रसिद्ध करावी, असे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठेबाजी करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अफवांमुळे पंपांवर गर्दी; शिस्तीसाठी तात्पुरती मर्यादा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर “इंधन संपले”, “पुरवठा बंद” अशा चुकीच्या हेडलाईन्स आणि थंबनेल्समुळे नागरिक घाबरून पंपांवर धाव घेत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून, प्रशासनाने इंधनावर तात्पुरती मर्यादा लादली आहे. दुचाकी वाहनांसाठी 200 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंत इंधन घेण्याची व्यवस्था केली आहे. ही मर्यादा टंचाईमुळे नसून, साठेबाजी रोखण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने नमूद केले. जिल्हा पुरवठा विभागानेही पुरवठा सातत्यपूर्ण सुरू असल्याचे वक्तव्य दिले आहे.
जुने व्हिडिओ शेअर करू नका; शहानिशा करण्याचे आवाहन प्रशासनाने सोशल मीडियावरील बातम्यांची अधिकृतता तपासण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी जिल्हा पुरवठा विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांचे किंवा जुन्या गर्दीचे व्हिडिओ-फोटो ‘कोल्हापूरमधील परिस्थिती’ म्हणून शेअर करू नये. यामुळे चुकीचा संदेश जाऊन अफवांचे पीक येईल, असा इशारा देण्यात आला. माध्यमांनी देखील नागरिकांना “केवळ गरजेनुसार इंधन घ्या, अनावश्यक साठा करू नका” असे आवाहन करावे आणि रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याबाबत जनजागृती करावी, असेही सांगितले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा चुकीची माहिती, मॉर्फ केलेले फोटो किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट्स फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 आणि आयटी ॲक्टनुसार कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय घोषणांवर विश्वास ठेवावा. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे यांनी सांगितले आहे की, “अफवा रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.”
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा