Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे.
जमिनीच्या वादातून पतीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एका जमिनीच्या प्लॉटचा व्यवहार कुटुंबासाठी इतका महागात पडेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा येथे संसाराची राखरांगोळी करणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरचा प्लॉट विकण्यावरून झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात आपल्याच पतीचा भीषण अंत केला. या कृत्यापूर्वी आरोपी पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना असहाय्य केलं आणि त्यानंतर जड वस्तूने प्रहार करून गळा आवळून त्यांचा जीव घेतला.
प्लॉट विक्रीस पत्नीचा विरोध
जेबास तालीब पठाण (वय ४६) असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. तर रशिदाबी जेबास पठाण (रा. घटनांद्रा) असं आरोपी पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत जेबास पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून स्टोव्ह, गॅस आणि मिक्सर दुरुस्तीचा छोटा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मोठ्या कष्टाने आणि पै-पै वाचवून त्यांनी घटनांद्रा गावात एक प्लॉट खरेदी केला होता. घरच्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी जेबास यांना हा प्लॉट विकायचा होता, मात्र त्यांची पत्नी रशिदाबी हिचा या विक्रीला टोकाचा विरोध होता. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून पती-पत्नीमध्ये सतत कटकटी सुरू होत्या. Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण; पोलिसांकडून न्यायालयात नवीन माहिती, कोठडीत पाच दिवसांची वाढ, तपासाचे प्रमुख मुद्दे कोणते?
मारण्याधी डोळ्यात मिरचीची पूड
सोमवारी २३ मार्च रोजी रात्री जेबास कामावरून घरी परतल्यानंतर पुन्हा एकदा प्लॉटच्या विक्रीचा विषय निघाला. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, रशिदाबीने संतापाच्या भरात घरातील तिखट मिरचीची पूड जेबास यांच्या डोळ्यात फेकली. काही समजण्यापूर्वीच तिने त्यांच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार प्रहार केला. जेबास जखमी होऊन जमिनीवर कोसळताच रशिदाबीने त्यांचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. हा सर्व प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून पहाटे ही घटना उघडकीस आली. Nashik Crime : नाशिकमधील बालिकेला अत्याचार करुन संपवलं, कनिष्ठ न्यायालयाच्या चुकीमुळे आरोपीची फाशीची शिक्षा रद्द
पुतण्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणाची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत जेबास यांचा पुतण्या रिजवान सांडू पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रशिदाबी पठाणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या भीषण हत्याकांडात अन्य कोणाची चिथावणी किंवा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा