• Thu. Jun 18th, 2026

    शंभूराज देसाईंसोबत घडलेल्या प्रकारावर एकनाथ शिंदेंचं मौन? ठाकरेंच्या शिवसेनेकडून चिमटा

    शंभूराज देसाईंसोबत घडलेल्या प्रकारावर एकनाथ शिंदेंचं मौन? ठाकरेंच्या शिवसेनेकडून चिमटा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    साताऱ्यात झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची मित्रपक्ष भाजपसोबतच जुंपली. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याचे पडसाद अधिवेशनातही उमटत आहेत. सोमवारी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात साताऱ्यातील गोंधळामुळे वातावरण तापलं होतं. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार उभे राहिले. पण एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाकडून कुणीच निषेध व्यक्त केला नाही, असं म्हणत ठाकरे सेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी निशाणा साधला. कार्यकर्त्यांसोबत उभं राहावं ते ठाकरेंनींच, असं म्हणत अयोध्या यांनी एकनाथ शिंदेंना कठोर शब्दांत सुनावलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed