• Sat. Jun 13th, 2026

    ‘टी-जंक्शन’वरील कोंडी फुटणार! शीव-पनवेल महामार्गावर पुलाचा विस्तार; दोन मार्गांमुळे पूर्व मुंबईकरांना फायदा

    ‘टी-जंक्शन’वरील कोंडी फुटणार! शीव-पनवेल महामार्गावर पुलाचा विस्तार; दोन मार्गांमुळे पूर्व मुंबईकरांना फायदा

    Mumbai Traffic: सायन पनवेल महामार्गावरील प्रवाशांसाठी महापालिकेने विस्तारचं काम हाती घेतलं आहे. टी-जंक्शनवर नेहमी होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुलावर दोन अतिरिक्त मार्गांचं काम सुरू असून आणखी दोन नवे मार्ग तयार करण्याची योजना आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शीव-पनवेल महामार्गाचा विस्तार सध्या सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या या कामात महामार्गावरील टी-जंक्शनवर उड्डाणपुलावर दोन समांतर मार्गांच्या बांधकामाला वेग दिला आहे. या मार्गाचं काम जानेवारी 2027पर्यंत पूर्ण करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातून वाशी आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

    नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाताना फायदा

    शीव-पनवेल महामार्गावरील टी-जंक्शनवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. पूर्व मुंबईतूल नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणारे प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतात. ही कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने शीव पनवेल महामार्गावरील पुलावर दोन अतिरिक्त मार्गांचं बांधकाम सुरू केलं. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 15 मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच, या मार्गामुळे मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर-मानखुर्द आणि वाशीदरम्यान थेट दुवा बनेल.Maharashtra TimesRaigad News: दोन दशकांनंतर अलिबागमधील ‘मिसिंग लिंक’ मार्गी, उसर-पोयनाड रस्त्याला गती; 10-15 मिनिटांत होणार प्रवास

    दरम्यान, महापालिकेने याच पुलावर आणखी दोन मार्ग उभारण्याची सुद्धा योजना तयार केली आहे. यामध्ये हार्बर लाइनवरील वाहतूककोंडी फोडण्यावर भर दिला जाईल. त्यामुळे चित्ता कॅम्प आमि महाराष्ट्र नगर परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना शीव-पनवेल मार्गावर सहज व कोंडीमुक्त प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या चार प्रस्तावित मार्गांमुळे शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

    कसे असतील मार्ग?

    प्रस्तावित पहिला मार्ग घाटकोपर आणि मानखुर्दमधील प्रवाशांना शीव-पनवेल महामार्गावरील वाशी परिसरात सहजपणे पोहोचवेल. दुसऱ्या मार्गामुळे घाटकोपर मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरून वाशीकडून घाटकोपरकडे जाणारी वाहतूक सुलभ होणार आहे. दरम्यान, नवीन योजनेतील तिसऱ्या मार्गामुळे घाटकोपर, मानखुर्द, पूर्व द्रुतगती मार्गापासून ते महाराष्ट्र नगर आणि हार्बर लाइनवरील चित्ता कॅम्प पर्यंत वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. तसेच, चौथ्या मार्गामुळे चित्ता कॅम्पवरून मानखुर्द आणि सायन-पनवेल महामार्गाच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना फायदा होईल.

    Maharashtra TimesPune News : पुणे-सोलापूर हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मध्यरात्री रस्ता ऑइलने माखला; अनेक गाड्या घसरल्या, लोणी स्टेशन परिसरात गंभीर प्रकार

    या पुलावरील पहिल्या दोन मार्गांचं बांधकाम ऑक्टोबर 2024मध्येच सुरू झालं होतं. सध्या या मार्गासाठी पायाभरणीचं काम सुरू आहे. दरम्यान, पुढील दोन मार्गांसाठी रेल्वेकडून अद्याप NOC मिळाली नाही आहे. पहिले दोन मार्गा जानेवारी 2027पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली. तसेच, या प्रकल्पामुळे महामार्गावरील टी-जंक्शनवरील कोंडी फोडण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा