• Sun. Sep 6th, 2026
Anil Parab : वाघ शेपटी घालून बसले, सत्तेवर लाथ मारा; सातारा प्रकरणावरून परबांनी डिवचलं


सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील संघर्षाने टोक गाठलं आहे. हा विषय शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत मांडला. सातारा जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या निवडणुकीवेळी शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सातारा पोलीस अधीक्षकांबाबत विधानपरिषदेत मंत्र्यांनी आक्रमक भूमिका मांडल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर अनिल परब यांनी यावर विधानपरिषदेत भाष्य करत डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका असं शंभूराज देसाई म्हणाले.. विधानपरिषदेत नेमकं काय घडलं पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed