MSRTC ST Bus: एसटी महामंडळाच्या ताफ्यात 3000 नव्या राजमाता जिजाऊ बस दाखल होणार आहेत. या नव्या स्मार्ट बसमुळे मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांदरम्यान धावणार आहेत.
नागपूरमध्ये सेवा होणार सुरू
या बससेवेची घोषणा फेब्रुवारीमध्येच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. आता या लोकार्पण सोहळ्यानंतर या सेवेला हिरवा कंदील मिळणार आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 3,000 राजमाता जिजाऊ या स्मार्ट बस दाखल होतील. दोन शहरांदरम्यान चालणाऱ्या या बस सर्वात आधी गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. घोषणेच्या वेळी या बस मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत सुरू होतील अशी माहिती मिळाली होती. आता ही सेवा सर्वात पहिली नागपूरमध्ये सुरू होणार असून पहिल्यांदा 50 बस शहरात दाखल होतील.
Kalyan-Dombivali AC Bus: कल्याण-डोंबिवलीकरांचा गारेगार प्रवास थांबला! शहरातील एसी बससेवा बंद; संपूर्ण उन्हाळा प्रवाशांना फटका
सध्या मुंबई-पुणे आणि इतर मोठ्या शहरांदरम्यान शिवनेरी, शिवशाही, शिवाई सारख्या बस एसटी महामंडळाकडून चालवल्या जातात. या बसला नेहमी गर्दी असून तिकीटांच्या परवडणाऱ्या दरामुळे मोठी मागणी असते. अनेकदा प्रवाशांना उभं राहून संपूर्ण प्रवास करावा लागतो. पण आता राजमाता जिजाऊ बस सेवेमुळे बसच्या संख्येत वाढ होणार आहे. या बसेस आधीपेतक्षा आधुनिक असल्यामुळे प्रवासही वेगवान आणि अधिक सुरक्षित होणार आहे.
काय असतील वैशिष्ट्ये
आता सुरू असलेल्या बसची आसन क्षमता 40 आहे. पण या नव्या बसमध्ये 3 बाय 2ची आसन रचना असून 56 आसन क्षमता असणार आहे. यामुळे साधारण बसेसपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकतात. शिवाय या नव्या बसेस स्मार्ट बसेस असतील. यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. दोन प्रमुख शहरांदरम्यान शटल सेवेसारख्या या बसेस चालवल्या जातील. प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूने ही सेवा सुरू होणार आहे. लवकरच या बसेसेवाचा विस्तार नागपूरहून इतर शहरांतही करण्यात येणार आहे.
Thane Ring Metro: ठाणे मेट्रोसाठी 12 हजार कोटी, शहरांतर्गत वर्तुळाकर प्रकल्प; 29 किमी मार्गावर 22 स्थानकं
मंगळवारी होणााऱ्या या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित असतील. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
दरम्यान, या बसमध्ये 4 CCTV कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, सुरक्षेसाठी पॅनिक बटन, महत्त्वाची माहिती देण्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि प्रवासाचा मार्ग दर्शवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मार्ग फलकसुद्धा असतील.
