• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat : ‘मी अवतारी पुरुष, तू मागील जन्माची अप्सरा, माझ्याशी लग्न कर’, अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

    भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. अशोक खरातच्या विरोधात नाशिकमध्ये तिसरी तक्रार दाखल झाली आहे. त्या तक्रारीत पीडित महिलेने आरोपीने कशाप्रकारे फसवलं? याबाबत सविस्तर मांडलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरात याच्या प्रकरणात नवनवीन माहिती मिळत आहे. अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने अशोक खरातच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पीडितेने आपल्या तक्रारीत आरोपी अशोक खरात हा धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाने कशाप्रकारे लैंगिक शोषण करायचा? याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या तक्रारीत महिलेने आरोपी अशोक खरात मंतरलेले पाणी देवून कशाप्रकारे अत्याचार करायचा, नेमकं काय सांगायचा? याबाबत महिलेने सविस्तर सांगितलं आहे.

    “मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्पोट हा लिखीत आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो, माझे नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना चांगल्याप्रकारे संभाळेल, असे म्हणून अशोक खरातने मला मिठीत घेतले. त्यावेळी मी त्याला विरोध करुन दूर लोटले. तुमचा विवाह झालेला असून तुम्हाला मुले आहेत, हे शक्य नाही, असे मी बोलले. आणि तेथून निघून गेले होते. त्यानंतर माझा 28 ऑक्टोबर 2021 रोजी घटस्फोट झाला. मी स्पर्धा परिक्षेच्या तयारी करीता दिल्ली येथे आभ्यासाकरीता गेले होते”, असं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

    पीडित महिलेने काय-काय म्हटलंय?

    “2013 मध्ये माझे आई-वडील माझ्या विवाहाकरीता स्थळ बघत होते. पण मला मनासारखे स्थळ मिळत नसल्याने माझा विवाह जमत नव्हता. त्या दरम्यान नाशिक येथील एका मुलाचे स्थळ मला आवडले होते. पण आमचा संसार सुखाचा होईल का? असा संशय असल्याने माझे आई-वडील काळजी करत होते. तेव्हा माझ्या आई-वडिलांना आमच्या परिचीत लोकांनी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात याच्या कार्यालय कॅनडा कॉर्नर या ठिकाणी असून ते चांगले ज्योतीषी आहेत, ते चेहरा पाहुन भविष्य वगैरे सांगतात आणि सल्ला देतात, असे सांगितले होते.”

    “यामुळे मला माझे आई-वडील हे सन २०१३ मध्येच ओकस प्रॉपर्टीज असे नाव असलेल्या कार्यालयात घेवून गेले होते. तिथे जाण्यापूर्वी कॅप्टन अशोक खरात यांची अपॉईंटमेंन्ट आम्ही घेतली होती. मी पहिल्यांदाच कॅप्टन अशोककुमार खरात यांना भेटले होते. त्यांनी मुलाचा फोटो बघितला आणि डोळे बंद करुन काहीतरी मंत्र पुटपुटुन हा विवाह करण्यास काहीएक अडचण नसून तुमचा संसार सुखाचा होईल असे सांगीतले. विवाहानंतर त्यांच्या गावी मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिरात जावून धार्मिक विधी करुन येण्यास सांगीतले होते. सदर विधी करतांना तुझ्या सासरच्या लोकांना सोबत न्यायचे नाही असे सांगीतले होते. त्याप्रमाणे मी मंदिरात जावून विधी केला होता.”

    “माझा विवाह २८ डिसेंबर २०१३ रोजी धार्मिक रितीरिवाजप्रमाणे झालेला होता. माझा आणि आमचा संसार चालू असतांना मला त्याच्यापासून दोन मुले झाले, त्यानंतर माझे पतीशी घरगुती कारणावरुन वादविवाद होत होते, त्या दरम्यान देखील मी तसेच माझे आई-वडील असे सल्ला घेण्याकरीता कॅप्टन अशोक खरात यांच्या कार्यालयात त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलामार्फत अपॉइंटमेंन्ट घेवून गेलो होतो. त्यावेळी कॅप्टन खरात हे त्यांच्याकडे आलेल्या लोकांना मंतरलेले पाणी, औषध, अंगारे, तसेच खडे आणि दोरे मंत्र मारुन देत होते, तसेच त्यांनी आम्हाला देखील वेगवेगळे सल्ले दिले होते.”

    “त्या दरम्यान फेब्रुवारी २०२० च्या सुमारास मी माझ्या आईसोबत कॅप्टन खरात यांच्या कार्यालयात ऑफिसबॉयकडून अपॉइंटमेंन्ट घेवून गेले असता, कॅप्टन खरात यांनी माझ्या आईला बाहेर बसण्यास सांगीतले होते. मी एकटी असतांना मला कॅप्टन खरात यांनी माझा हात धरुन सांगितले की “मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्पोट हा लिखीत आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो, माझे नशिबात दोन विवाह आहेत, तु माझ्याशी विवाह कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना चांगल्याप्रकारे संभाळेल” असे म्हणून मला मिठीत घेतले. त्यावेळी मी त्यांना विरोध करुन दूर लोटून “तुमचा विवाह झालेला असून तुम्हाला मुले आहेत, हे शक्य नाही”, असे बोलले. आणि तेथून निघुन गेले होते. त्यानंतर माझा २८ ऑक्टोबर २०२१ रोजी घटस्फोट झाला. मी स्पर्धा परिक्षेच्या तयारी करीता दिल्ली येथे आभ्यासाकरीता गेले होते.”

    “माझा घटस्फोट झाल्यानंतर मी माझे आणि दोन मुलांच्या भविष्याच्या चिंतेने खचले होते, म्हणून मी दिल्ली येथून सुट्टीवर आल्यानंतर मला माझे आई-वडील कॅप्टन खरात यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात घेवून जात होते. कॅप्टन अशोककुमार खरात हे देखील मला त्यांच्याकडील फोन क्रमांकवरुन मला फोन करुन माझी विचारपूस करत होते. त्या दरम्यान मे २०२२ च्या सुमारास मी नाशिक येथे असतांना मला कॅप्टन खरात यांनी फोन करुन “तुझे भविष्या संदर्भात महत्वाचे बोलायचे आहे” असे सांगून मला त्यांचे ऑफिसमध्ये बोलावून घेतले.”

    “मी एकटीच त्यांच्या कार्यालयात गेले असता कॅप्टन खरात याने पुन्हा अत्याचार केला. तेव्हा मी त्यास विरोध केला असता त्याने मीच तुझ्याशी विवाह करणार आहे, तुझ्या मुलांचा सांभाळ करणार आहे, तुला चांगले भविष्य बघायचे असेल तर माझे ऐकावे लागेल, माझे ऐकले नाहीतर तुझ्यावर कोप होईल, मी सांगतो तो विधी कर, असे म्हणून त्याने अत्याचार केला”, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

    “अशोक खरात याने माझ्या मनात माझ्या भविष्याविषयी आणि माझ्या मुलांविषयी भिती घातली. यामुळे मी सदर प्रकाराबाबत कोणास काही एक सांगितले नाही. सदर प्रकारानंतर पुन्हा तीन ते चार वेळी मला कॅप्टन खरात याने फोन करुन तुझ्या उज्ज्वल भविष्याकरीता तू लगेच कार्यालयात ये असे सांगून त्यांचे कार्यालयात बोलावून घेतले होते. प्रत्येकवेळी धार्मिक विधीच्या नावाखाली त्यांच्याकडील वेवगवेळे पदार्थ प्रसाद म्हणून खान्यास देवून आणि मंतरलेले पाणी पिण्यासे सांगून माझ्याशी माझ्या मनाविरुद्ध शारीरीक संबध केले.”

    “या दरम्यान मला दिवस गेल्याचे प्रेग्न्सी टेस्ट कीटचे परिक्षणावरुन माझ्या लक्षात आल्याने मी त्याबाबत कॅप्टन अशोक खरात यांना त्यांच्या कार्यालयात जावून सांगितले असता त्यांनी मला काही गोळ्या त्यांच्यासमोरच खाण्यास दिल्या होत्या. मी त्या गोळया खाल्यानंतर काही दिवसांनी माझे ब्लडींग होवून माझा गर्भपात झाला.”

    “३० ऑक्टोबर २०२४ रोजी मला कॅप्टन खरात यांचा मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. त्यांनी माझ्याकडे माझ्या आई-वडिलांचे तसेच भावाचे आधारकार्ड, पॅन कार्ड आणि त्यांचे फोटो व्हॉट्सअप कर असे सांगितले होते. त्यावेळी मी त्यांना कशाकरीता डॉक्युमेंन्ट पाहिजे असल्याचे विचारले असता त्यांनी तुला बॅकेतून ओटीपी येईल तो बॅकेतील लोकांना सांग, असे सांगितले होते. यामुळे मी त्यांना सर्व कागदपत्र व्हॉट्सअप केले होते. त्यांनतर काही वेळाने माझ्या फोनवर ओटीपी आला होता. मला समता पतसंस्था बँकेतील एका व्यक्तीने फोन करुन ओटीपी मागितला असता मी त्यांना तो ओटीपी दिला होता.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा