Nashik Crime: नवरा- बायकोच्या वादाने भयंकर घडलं. पालखेड कालव्यात पतीने तीन लहान मुलांसह ऊडी घेऊन जीवन संपवलं. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
दीपक पवार याचा पत्नीशी रविवारी सकाळी किरकोळ वाद झाला. या वादानंतर मुलांना केस कापण्यासाठी घेऊन जातो असे सांगून बाहेर पडलेल्या दीपकने तीन मुलांसह घर सोडले. रानवड हद्दीतील पालखेड डाव्या कालव्याच्या चारी नंबर १० मध्ये दीपकने आधी दोन मुलांना पाटात फेकले, नंतर दीड वर्षाच्या मुलाला उराशी घट्ट धरुन स्वत:ही पाण्यात उडी घेतली. हे दृश्य आजूबाजूच्या लोकांनी पाहिले. आरडाओरडा झाल्याने लोकांनी गर्दी केली. मोठ्या दोन मुलांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी एकच्या दरम्यान दीपक पवारसह प्रसाद व वीर या मुलांचे मृतदेह आढळले, तर अविनाश अद्याप बेपत्ता आहे.
Electric Shock Death: नाशकात विजेच्या धक्क्याने 19 म्हशींचा मृत्यू; निष्काळजीपणाचा वीज विभागावर आरोप
पती-पत्नीत वाद
पालखेड कालव्याला आवर्तनाचे पाणी वेगाने वाहत असल्याने शोधकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपक, त्याची पत्नी पूजा आणि भाऊ राहुल हे तिघेही सात वर्षांपासून रानवड येथील शिवप्रसाद वाघा वायनरी येथे काम करीत होते.
Chhagan Bhujbal: राजकारणात बंधने पाळावीत; अशोक खरात प्रकरणावर छगन भुजबळांचा सल्ला
घटनेच्या दिवशी पती-पत्नीत काहीतरी वाद झाल्याची चर्चा परिसरात होती. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस करीत आहे.
