Jalgaon Man Kills Brother: 21 मार्चला जळगावमध्ये एका नदीपात्रात तरूणाची बॉडी सापडली. त्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन दिवसांत लावला असून तरूणाच्या भावानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
चोपडा तालुक्यातील नारोद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील(वय 23) दिनांक 21 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोदेतील गुड नदी पात्रात गावकऱ्यांना दिसून आला यात मयत रोहनच्या डोक्याला गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी सदर घटना नारोदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी आढाव पोलीस यांना सदर घटना कळवली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता सदर तरुणाचा खून त्याचाच मोठा भाऊ किरण पाटील यांनी केला असल्याची तपासात समोर आले.
Ashok Kharat Video : पोलिसांनी अशोक खरातला आणलं वठणीवर; म्हणाला, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, व्हिडीओ समोर
असा लागला तपास
रोहनची हत्या झाली याची माहिती मिळतात जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस आणि त्यांची टीम नारोदला दाखल झाली. त्यानंतर त्यांनी तपासाची चक्र फिरवली. त्यांनी मयत रोहनचा मोठा भाऊ किरणला तपासासाठी बोलवले असता त्याच्या चेहऱ्याला काटेरी जखमा झाल्या होत्या. याबाबत पोलिसांनी त्याला विचारणा केली असता कामादरम्यान या जखमा झाल्या असल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांचा संशय त्याच्यावर बळकावल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि सदर हत्या लहान भावाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून केली असल्याची कबुली किरणने दिली.
Parbhani Crime : परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी, रागाच्या भरात स्वतःच्याच सहकाऱ्यावर दोनदा स्काॅर्पिओ घातली; व्हिडिओ समोर
नेमकं काय घडलं?
रोहन हा नेहमी दारूच्या नशेत असायचा, आई-वडील, भावाला शिवीगाळ करीत होता घरात रोज वाद असल्याने सर्वजण रोहनला घरात कंटाळलेले होते असे किरणने यावेळी सांगितले. दिनांक 20 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपी किरण ने लहान भाऊ मयत याला पाच हजार रुपये दिले. त्यातून रोहन दारू प्यायला, तो दारूच्या नशेत असल्यामुळे संधी साधत किरण ने नारोद परिसरातील गुळी नदीवरील पुलावरून रोहनला ढकलले यात रोहन जखमी झाला. त्यानंतर किरणने रोहनच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या केली असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले.
