• Sat. Jun 13th, 2026
    Shivsena UBT: उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल? शिवसेना उबाठाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक

    Shivsena UBT MPs Meeting: शिवसेना (उबाठा) पक्षाच्या खासदारांची उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

    शिवसेना उबाठा खासदार बैठक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत रविवारी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर पार पडली. खासदार आणि पक्षातील विसंवादावर या बैठकीत चर्चा झाल्याचे एकीकडे सांगितले जात आहे. तर, पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

    या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि पवन राजे निंबाळकर तसेच प्रियांका चतुर्वेदी आदी खासदार उपस्थित होते.

    वारकरी संप्रदाय म्हटल्याने चाकणकरांचा समाचार; अयोध्या पौळ यांचं राणे, पडळकर, लांडगेंवर टीकास्त्र

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर मोहीम हाती घेतल्याची चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेत अधिकच भर पडली आहे. दुसरीकडे खासदारांच्याही पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत काही तक्रारी असल्याचे पुढे आले आहे.

    दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी अलिकडेच झालेल्या बैठकीमध्ये पक्षातील खासदारांनी पक्षश्रेष्ठींविरोधातच तक्रारीचा पाढा वाचल्याचे समजते. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून फारशी आार्थिक मदत झाली नाही, ⁠उद्धव ठाकरे प्रचारात फिरकले नाहीतच, पण आदित्य ठाकरेही महाराष्ट्रात फिरले नाहीत, अशा तक्रारी पक्षातील खासदारांनी केल्याचे समजते.

    Maharashtra TimesLPG Shortage : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
    खासदारांनी मांडल्या समस्या
    खासदार संजय राऊत यांनीही या बैठकीनंतर विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव केला जात आहे, अशी खासदारांची तक्रार असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी सर्व खासदार चर्चा करतील, असेही ते म्हणाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्याचे समजते. विकासनिधी मिळत नसखासदार अरविंद सावंतल्याने सर्वसामान्य मतदारांच्या विकासाची कामे करता येत नसल्याचेही सांगितल्याचे समजते. त्यावर या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, ऑपरेशन टायगरबद्दल बोलणाऱ्यांचे दिल्लीत जाऊन म्याव होते, अशी टीका यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा