• Fri. Jun 5th, 2026
    Beed Crime : परळीत दळण आणायला गेलेल्या चिमुकलीवर 50 वर्षीय किराणा दुकानदाराचा अत्याचार, नराधम आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    धर्मापुरी येथे एका ५० वर्षीय नराधमाने १० वर्षांच्या शाळकरी मुलीवर दोनदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी बालाजी पांचाळ याला पोलिसांनी अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    परळी तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड येथील परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत दोनवेळा एका 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पीडितेच्या घरच्यांना कळताच परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील धामपुरी येथील रहिवाशी अल्पवयीन पीडिता 10 वर्षे वयाची असून ती इयत्ता 5 वी वर्गात शिक्षण घेत आहे. या पीडित नाबालिक मुलीस तिच्याच गावातील एका किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानात बोलावून घेत तिच्यासोबत अत्याचार केला हा प्रकार दोन महिन्यापूर्वी देखील करण्यात आला आणि त्यानंतर त्या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही.

    नराधमाला पोलिसांच्या हवाली केले

    याच कारणामुळे या नराधमाचा विश्वास बळावला आणि त्याने पुन्हा दोन महिन्यांनंतर आरोपी नराधम बालाजी पांचाळ (सुतार) वय 50 वर्षे रा. धर्मापुरी परळी याने लौंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. या घटनेने पीडित चिमुकलीच्या नातेवाईकात संतापाची लाट पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी नराधमाला तात्काळ ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले असल्याचे समोर आले आहे.

    Maharashtra TimesBeed News : कामावरून घरी आला, जेवण केलं अन् खोलीत गेला; काही तासांतच टिप्पर चालकाने टोकाचं पाऊल उचललं

    गुन्हा दाखल

    सदर प्रकरणात पीडित नाबालिक चिमुकलीच्या आई-वडिलांनी परळी येथील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. झालेला सर्व प्रकार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ आरोपीविरोधात तत्काळ गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

    किराणा दुकानात अत्याचार

    दिलेल्या फिर्यादीत सांगण्यात आले आहे की, दिनाक 18 मार्च रोजी दुपारच्या सुमारास दळण दळण्यासाठी गेली असता पुन्हा एकदा दुकानदार नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस गिरणीत आल्याचे पाहून तिला त्याच्या किराणा दुकानात बोलावून अत्याचार केला आणि पुन्हा त्या मुलीस याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई वडिलाना जीवे मारून टाकेल, अशी धमकीही दिली. या भीतीपोटी या चिमुकलीने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही.

    आईने विश्वासात घेतले

    मात्र मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पाहून मुलीच्या आईने त्या चिमुकल्या मुलीस विश्वासात घेऊन विचारले असता सर्व प्रकार सांगितला. तत्काळ आज रोजी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्को अंतर्गत परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम बालाजी पांचाळ याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम पोस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणात एपी आय जाधवर तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणाचा तपास हा अंबाजोगाई येथील पिंक पथक करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा