Neeraj Jadhav : शिर्डीमध्ये २४ वर्षीय तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करुन आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही तपास एसआयटीकडे आहे.
काय आहे प्रकरण?
अशोक खरातने तंत्र-मंत्रांसह धार्मिक आस्थेच्या नावाखाली स्त्रिया आणि त्यांच्या नातलगांना जिवाची भीती घालून शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासह राज्यातील इतर दोन गुन्ह्यांचा एकत्र तपास करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाकडून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या आदेशान्वये ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे. त्यानुसार राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१ च्या समादेशक तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांनी तीन दिवसांपासून तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत.पोलिसांचे पथक नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यासह नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिसात खरातने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल खंडणीच्या गुन्ह्याचाही तपास करत आहे. यासह शिर्डीमध्ये २४ वर्षीय तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करुन आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही तपास एसआयटीकडे आहे.
Indore Fire : काळ सर्वकाही हिरावून घेईल; स्टेटस ठेवून झोपले, मध्यरात्री आगीने गिळलं, सासरे-सुनेचा मृत्यू, मायलेक जखमी
नाशिक पोलिस आयुक्तालयातील ‘हिमांशू’ या अतिथीगृहात आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे तात्पुरते तपास केंद्र तयार करण्यात आले आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलासह राज्यातील इतर ठिकाणच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश एसआयटीमध्ये आहे. अतिथीगृहात दोन दिवसांपासून सातत्याने राज्यातील पोलिसांचा राबता असून, मुख्यालयास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अजित पवारांच्या अपघातात कॅप्टन खरातचा हात? देवगिरी बंगल्यासमोर अघोरी प्रयोग, अमोल मिटकरी थेट बोलले
Gautam Singhania : रेमंड अध्यक्ष गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, मुंबईत उपचार; रशियन महिलेसह चौघं भारतीय वाहून गेले
मुलीवर अघोरी उपचार
एका उपकरणाच्या साह्याने अल्पवयीन मुलीवर अशोक खरातने उपचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याच्या कार्यालयात मुलीची आई एका सोफ्यावर बसलेली असून, तिच्यासमोरच मुलीचा टी-शर्ट सरकवून पोटावर एक उपकरण खरात फिरवत आहे. ते उपकरण ‘इंटरनेट केबल क्रिंपिंग टूल’ (केबल जोडण्याचे यंत्र) असून भोंदूगिरीचा हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र याबद्दल खरातविरुद्ध पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही.
