• Sat. Jun 6th, 2026
    Ravi Pujari : पोलिस घेणार रवी पुजारीच्या आवाजाचे नमुने, अन्य गुन्ह्यांतही होणार चौकशी; प्रकरण काय?

    Ravi Pujari : कुख्यात गुंड रवी पुजारीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर आता पोलिस रवी पुजारीच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार आहेत.

    गुंड रवी पुजारी आवाजाचे नमुने(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : बांधकाम व्यावसायिकाला १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्याच्या एका प्रकरणात अटक करण्यात आलेला गँगस्टर रवी पुजारी याची ठाणे पोलिस कसून चौकशी करत आहेत. पुजारी याच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे आयुक्तालयातील अन्य गुन्ह्यांतही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

    आवाजाच्या नमुन्यांची तपासणी

    ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात सन २०१७मधील दाखल खंडणी, मकोकाच्या गुन्ह्यात चौकशीसाठी रवी पुजारीला ठाणे पोलिसांनी बेंगळुरू कारागृहातून नुकतेच ताब्यात घेतले. या गुन्ह्यात दोन आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर, पुजारी फरार होता. मात्र, आता तोही पोलिसांच्या हाती लागला असून १० दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये आहे. ५७ वर्षांच्या पुजारीला नेमका आश्रय कुणी दिला, तो राहिला कुठे, त्याला सिमकार्ड कुणी पुरवली, तो कुणाच्या संपर्कात होता, याबाबत पोलिस सखोल चौकशी करणार आहेत. त्याशिवाय, त्याच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
    Maharashtra TimesAshok Kharat Case : खरातच्या कुकर्मांची शंभरी! मुलीवर अघोरी उपचार, एक हजार कोटीहून अधिक माया, 100 व्हिडिओंचा तपास; भोंदूबाबाचे भयंकर कारनामे

    प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला

    ठाणे पोलिस आयुक्तालयातील सहा गुन्ह्यांमध्ये पुजारीची चौकशी केली जाणार आहे. कासारवडवलीच्या गुन्ह्यात चौकशी करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकचा असलेला पुजारी हा सन २०१९मध्ये रिपब्लिक ऑफ सेनेगल या देशात पकडला गेल्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याचा प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला होता.

    नेमकं प्रकरण काय?

    खंडणीसह अन्य विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गुंड रवी पुजारी याला ठाणे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं आहे. पुजारीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक बेंगळुरू येथे गेले होते. हे पथक ठाण्यात दाखल झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. पुजारी हा बेंगळुरू येथील कारागृहात होता, असेही या अधिकाऱ्याने सांगितलं.
    Maharashtra TimesAshok Kharat : चोर आलेsss अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याबाहेर पोलिसांचं सोंग, ‘भोंदू कॅप्टन’ डोळे चोळत अर्धवट कपड्यात बाहेर, खाकी वर्दीने गराडा घातला

    दुपारी न्यायालयात हजर करणार

    ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका जुन्या खंडणीच्या प्रकरणात चौकशीसाठी पुजारी याला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी करीत आहे. पुजारी याला आज बुधवारी १८ मार्च रोजी दुपारी २ नंतर न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रवी पुजारी याच्याविरुद्ध २० पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा