• Tue. Jun 16th, 2026
    Ashok Kharat Case : अशोक खरातच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित, कागदपत्रांमधून माहिती उघड

    अशोक खरात प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोर खरात याच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण चांगलेच गाजत आहे. बड्या नेत्यांचे आणि बड्या अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टन अशोक खरात या भोंदू ज्योतिषावर सध्या सरकारवाडा पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. SIT मार्फत त्याची कसून चौकशी सुरू आहे. यातच आता या भोंदूच्या श्री. शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना, मिरगाव इथल्या ‘श्री शिवनिका संस्थान’साठी दारणा धरणातून तब्बल 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या बलात्कार प्रकारात अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष असलेल्या या खासगी संस्थानाला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवल्याची माहिती हाती लागलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून पुढे येत आहे.

    पाणी आरक्षणाबाबत शासन निर्णय

    या पाणी आरक्षणाबाबतचा शासन निर्णय 31 जुलै 2020 रोजी निर्गमित करण्यात आला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे एका खासगी संस्थानाला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले, तर दुसरीकडे सिंचनासाठी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. ही माहिती पुढे आल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

    कॅप्टन अशोक खरात याचा मंत्रालयातील दबदबा या निमित्ताने उघड झालाय. त्याने राजकीय वजनाचा वापर करत सदरचे आरक्षण हे पदरी पाडून घेतल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगली आहे. हक्काचे पाणी खाजगी संस्थेकडे वळवल्याने येत्या काळात शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सदर शासन निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी आता नाशिक जिल्ह्यातून होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी शासन काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा