Nashik Ashok Kharat Case : संशयित खरातच्या घरातून दोन लॅपटॉप आणि आठ लाख रुपयांसह एक पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. खरातच्या लैंगिक अत्याचारासह आक्षेपार्ह व्हिडिओची संख्या ५८ ऐवजी शंभरपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
भोंदूगिरीचा ‘कॅप्टन’
नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित अशोककुमार खरातविरुद्ध (रा. तृप्तबाला बंगला, गोविंदनगर) बलात्कारासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. यासह राज्यातील इतर दोन गुन्ह्यांचा एकत्रित तपास करण्यासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या आदेशान्वये ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे. त्यानुसार राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक एकच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांनी तीन दिवसांपासून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शुक्रवारी या प्रकरणात खरातचा ‘ऑफिस बॉय’ नीरज जाधव याला नाशिकमध्ये पोलिसांचे संरक्षण देण्यात आले. त्याने खरातच्या लॅपटॉपमधून सीसीटीव्हीचे फुटेज काढून हे अत्याचार प्रकरण बाहेर आणल्याचे समजते. त्याच्यावर दबाव येण्याची शक्यता असल्याने सखोल तपासाकरीता ‘प्रोटेक्शन’ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
Ashok Kharat : चोर आलेsss अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याबाहेर पोलिसांचं सोंग, ‘भोंदू कॅप्टन’ डोळे चोळत अर्धवट कपड्यात बाहेर, खाकी वर्दीने गराडा घातला
एक हजार कोटीहून अधिक मालमत्ता
‘कॅप्टन’ खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे आतापर्यंत शेतजमिनी व एनए प्लॉट्सचे मिळून ७० पेक्षा अधिक सात-बारा उतारे मिळून आले आहेत. आणखी काही मालमत्ता या आठवड्याच्या अखेरपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे. काही मालमत्ता इतर नातेवाईक, खासगी व्यक्ती तसेच काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही नावे असल्याचे समजते. त्याने काही जागा भागीदारी तत्त्वानेही खरेदी केलेल्या आहेत. खरात व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनींचे आजचे बाजारमूल्य एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समजते. भोंदूगिरीसोबतच जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवसायात हा बाबा उतरलेला होता. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात बहुतांश मालमत्ता आहेत. नाशिकमध्ये पाथर्डी, आडगाव, गौळाणे, मिरगाव, कुंदेवाडी तर अहिल्यानगरच्या निघोजमध्ये त्याच्या मालमत्ता आहेत.
अतिथीगृह बनले तपास केंद्र
नाशिक पोलिस आयुक्तालयातील ‘हिमांशू’ या अतिथीगृहात आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे तात्पुरते तपास केंद्र तयार करण्यात आले आहे. नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलासह राज्यातील इतर ठिकाणच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश ‘एसआयटी’त आहे. अतिथीगृहात दोन दिवसांपासून सातत्याने राज्यातील पोलिसांचा राबता असून, मुख्यालयास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Rupali chakankar: रुपाली चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? प्रफुल्ल पटेलांचे स्पष्ट संकेत
मुलीवर अघोरी उपचार
एका उपकरणाच्या सहाय्याने अल्पवयीन मुलीवर संशयित खरातने उपचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याच्या कार्यालयात मुलीची आई एका सोफ्यावर बसलेली असून, तिच्यासमोरच मुलीचा ‘टी-शर्ट’ सरकवून पोटावर एक उपकरण खरात फिरवत आहे. ते उपकरण ‘इंटरनेट केबल क्रिंपिंग टूल’ (केबल जोडण्याचे यंत्र) असून भोंदूगिरीचा हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुर्दैवाने संशयित खरातविरुद्ध तक्रारीसाठी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
