Nashik Women Assault Case : संशयित अशोक खरात आलिशान बंगल्यातून सहजासहजी बाहेर येणार नाही, हे ओळखून पोलिसांनी वर्दीचा रुबाब बाजूला ठेवत चक्क चोरांचे सोंग घेतले.
हायप्रोफाईल आरोपी जाळ्यात
दैवी शक्ती, मंत्र-तंत्राचा वापर, भविष्यातील घटनांची भीती दर्शवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन (वय ६७) याची गैरकृत्ये उघड होत आहेत. राजकीय वर्तुळातही खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकारामुळे खरातच्या अटकेबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती. खरात हे ‘हायप्रोफाइल’ वर्तुळातील ‘सावज’ असल्याने त्याला नेमकी कशी अटक झाली, हा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Gautam Singhania : रेमंड अध्यक्ष गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, मुंबईत उपचार; रशियन महिलेसह चौघं भारतीय वाहून गेले
कसा रचला सापळा?
दरम्यान, या थरारक कारवाईची बीजे १७ मार्च २०२६ रोजी दुपारीच पेरली गेली. पीडिता पोलिसांत पोहोचल्यानंतर घटनेची सत्यता पडताळून फिर्याद नोंदवण्याच्या प्रक्रियेला वेग आला. रात्री उशिराने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाचे ‘प्रभारी’ असलेल्या पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांना संशयिताला अटक करण्याचा ‘टास्क’ सोपवला. एकीकडे कागदोपत्री फिर्याद नोंदवून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू होती. तर, दुसरीकडे खरात पसार होऊ नये म्हणून सापळा रचला जात होता. त्यातच संशयित आलिशान बंगल्यातून सहजासहजी बाहेर येणार नाही, हे ओळखून पोलिसांनी वर्दीचा रुबाब बाजूला ठेवत चक्क चोरांचे सोंग घेतले.
Indore Fire : काळ सर्वकाही हिरावून घेईल; स्टेटस ठेवून झोपले, मध्यरात्री आगीने गिळलं, सासरे-सुनेचा मृत्यू, मायलेक जखमी
…असा रंगला थरार!
मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास गुंडापथक नाशिक शहरातील गोविंदनगर परिसरातील कर्मयोगीनगरात पोहोचले. संशयित खरात याच्या ‘तृप्तबाला’ या बंगल्याबाहेर एक तुकडी तैनात झाली. संदीप पवार यांच्यासह अंमलदार बंगल्यात शिरले. बंगल्याचे दार वाजवून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास संशयित सावध किंवा पसार झाला असता. त्यामुळे ‘सावज’ बाहेर आणण्याचा डाव पोलिसांनी आखला. काहींनी गच्चीवरून तर काहींनी अंगणात धावण्यास सुरुवात केली. चोरांप्रमाणे मोठ्याने धापा टाकत आरडाओरड सुरू केली.
रूपाली चाकणकरांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो, तंत्र विद्येचे धक्कादायक प्रकार; सुषमा अंधारेंकडे पुरावे
बंगल्यात बऱ्याच खोल्या असल्याने पोलिस आत जाऊ शकत नव्हते. त्यातच दोन-तीन मिनिटांनी डोळे चोळत संशयित खरात अर्धवट कपड्यातच बंगल्याबाहेर आला. ‘कुठेय चोर… तुम्ही कोण’, असे खरातने विचारताच पथकाने त्याला गराडा घातला. पोलिसांच्या या चाणाक्ष आणि धाडसी ‘माइंड गेम’मुळे मोठ्या गुन्ह्यातील संशयित वेगळा कायद्याच्या कचाट्यात अडकण्यास मदत झाली.
