• Fri. Sep 18th, 2026
Rupali chakankar: रुपाली चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? प्रफुल्ल पटेलांचे स्पष्ट संकेत

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचीही नावे येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पक्षश्रेष्ठींनी याविषयी मौन बाळगले होते. मात्र, पक्षाकडून शुक्रवारी याविषयी प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. पक्ष येत्या एक ते दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नमूद केले. त्यामुळे चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ पक्षातील पदही सोडावे लागणार की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खरात प्रकरणात सातत्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहेत. चाकणकर यांनी खरात यांना आपण ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. परंतु, त्यानंतर त्यांचे खरात याच्यासोबची छायाचित्रे आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. याविषयी पक्षाकडून मात्र, कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. अखेर, कार्याध्यक्ष पटेल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Rupali Chakankar Resignation : राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘खरातला गुरु मानलं, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी’
‘खरात प्रकरणात चौकशीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष म्हणून एक ते दोन दिवसांत योग्य ती कारवाई करू’, असेही पटेल म्हणाले.

Maharashtra TimesRupali Chakankar Resignation : ‘वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने राजीनामा देते’, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही ‘एक्स’च्या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली. ‘खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येत आहे, ती उद्विग्न करणारी आहे. या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसांत तक्रार नोंदवावी’, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरू मानले होते. पण, ही घटना कळली तेव्हा धक्का बसला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन कारवाई व्हावी. – रूपाली चाकणकर

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed