• Thu. Jun 18th, 2026

    Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले

    Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले

    Summer Special Trains 2026: उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि छटपूजा व इतर गर्दीच्या वेळी पुणे विभागातून सर्व प्रमुख शहरांसाठी जादा (विशेष) रेल्वे गाड्या सोडण्यात येतात.

    goa express(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पुण्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या आझाद हिंद , झेलम, लखनौ, गोवा, अजमेर आणि दानापूर एक्स्प्रेस सह इतर महत्त्वाच्या रेल्वे गाड्या १६ मेपर्यंत ‘फुल्ल’ झाल्या आहेत. झेलम, आझाद हिंद आणि दानापूर या गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविण्यात (रिग्रेट) आले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

    शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यानंतर बरेच जण पर्यटनाला आणि गावी जातात. या सुट्टीच्या हंगामात पर्यटन व देवदर्शनासाठी अनेक जण पूर्वनियोजित तयारी करतात. दहावी, बारावी आणि शालेय परीक्षा संपल्यानंतर एप्रिल, मे आणि जूनचे पहिले दोन आठवडे रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. यामुळे या काळात रेल्वेचा प्रवास करताना दोन महिने अगोदर तिकीट बुक केले तरी कन्फर्म तिकीट मिळणे अवघड आहे. शिवाय पुण्यातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या झेलम, आझाद हिंद आणि दानापूर या गाड्या बाराही महिने फुल्ल असतात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात या गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो; परंतु प्रवाशीसंख्या जास्त असल्याने या प्रमुख गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले आहेत. त्यामुळे या गाड्यांचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. अनेकदा जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

    Maharashtra TimesRupali Chakankar: रुपाली चाकणकरांनीही तंत्र-मंत्र विद्येचा वापर केला, पीडित महिलेनंच सांगितलं; फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
    जादा गाड्यांचे नियोजन
    गेल्या वर्षी पुणे विभागातून उन्हाळी सुट्टीत ८०० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा रेल्वे आणि प्रवासी या दोघांनाही झाला होता. यंदाही उन्हाळी सुट्टीत जादा रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    Maharashtra TimesPune Nashik Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे ‘हायव्होल्टेज’ पेचात; ‘महारेल’कडून 685 कोटी परत घेण्याची प्रक्रिया सुरु
    अशी आहे वेटिंग संख्या…
    झेलम एक्स्प्रेस वेटिंग (२५)
    हावडा एक्स्प्रेस वेटिंग (८९)
    दानापूर एक्स्प्रेस वेटिंग (११९)
    गोरखपूर एक्स्प्रेस -रिग्रेट
    गोवा एक्स्प्रेस -रिग्रेट
    (रिग्रेट कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले)

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा