• Sun. Jun 7th, 2026
    Ashok Kharat Case : सुनील तटकरे यांची अशोक खरात प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया, योग्य पाऊल उचलणार असल्याचे दिले संकेत

    अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस या प्रकरणात सखोल तपास करतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलू, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ज्योतिष तथा अंकशास्त्रात आपण तज्ज्ञ असल्याचा दावा करुन अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खरात याचे कूकृत्य उघडकीस आले आहेत. अशोक खरात याच्या प्रकरणातील FIR ची कॉपीदेखील समोर आली आहे. या FIR मध्ये आरोपी अशोक खरात कशाप्रकारे महिलांना जाळ्यात अडकवायचा? ते समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. अशोक खरात याच्या आक्षेपार्ह अशा अनेक क्लिप्स पोलिसांच्या हाती लागल्या आहे.

    अशोक खरातचे जवळपास 100 व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच अशोक खरात हा नामांकीत असल्याने त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध होते, अशी चर्चा आहे. त्याचे काही नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेदेखील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलू असं स्पष्ट म्हटंल आहे.

    सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले आहेत?

    “नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा