• Wed. Jul 8th, 2026

    Mumbai Crime: मुंबईत एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार; तरुणाने मैत्रिणीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली, नंतर प्रकरण अंगलट

    Mumbai Crime: मुंबईत एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार; तरुणाने मैत्रिणीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली, नंतर प्रकरण अंगलट

    Mumbai News: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत झालेल्या मैत्रीनंतर तरुण तिच्या प्रेमात पडला आणि नंतर तो लग्नासाठी हट्ट करू लागला.

    मुंबईत एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार; तरुणाने मैत्रिणीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली, नंतर प्रकरण अंगलट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मानखुर्द येथील तरुणाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. मात्र तरुणीला तो पसंत नसल्याने तिने त्याला नकार दिला. वारंवार सांगूनही तरुणी ऐकत नसल्याने तरुणाने कुटुंबाला घेऊन तिचे घर गाठले आणि लग्नाची मागणी घातली. मात्र त्यासाठीही तिने नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिचा कॉलेजपर्यंत आणि सोशल मीडियावरही पाठलाग सुरू केला. अखेर या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

    मानखुर्द परिसरात राहणारी २४ वर्षीय चंद्रिका (बदललेले नाव) ही नेरूळ येथील डेंटल कॉलेजमध्ये शिकते. ती राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिच्यासोबत मैत्री केली. काही वर्षे मैत्री ठेवल्यानंतर त्याने चंद्रिका हिला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तरुणीने मात्र यासाठी नकार दिला. तिचे मन परिवर्तन करण्यासाठी या तरुणाने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले, मात्र तरुणीने आपण मित्र म्हणून राहूया, असे ठामपणे सांगितले. इतके सांगूनही त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. तिच्या नेरूळ येथील कॉलेजपर्यंत तो पाठलाग करू लागला. चंद्रिका मात्र नकारावर ठाम होती.

    चंद्रिका ऐकत नसल्याचे पाहून तरुणाने कुटुंबातील सदस्यांना घेऊन तिचे घर गाठले आणि तिला मागणी घातली. मात्र तेव्हाही तरुणीने लग्नास नकार दिला. यामुळे हा तरुण अधिकच संतापला आणि त्याने तिचा सोशल छळ सुरू केला. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये त्याने तरुणीची बदनामी केली. तिच्या वडिलांना शिवराळ भाषेचे ईमेल या तरुणाने पाठवले. इच्छा नसतानाही हा तरुण जबदरस्ती करीत असल्याने आणि तो काहीही करण्याची भीती असल्याने चंद्रिका हिने मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली. मानखुर्द पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा