आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमेनसामने असणार आहेत. कोलकाताचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना असणार आहे. अजिंक्य रहाणे केकेरआरच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर ऋषभ पंत याच्या खांद्यावर लखनौचं नेतृत्वाची जबाबदारी आहे. लखनौची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. त्यानंतर लखनौने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे लखनौचा केकेआर विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.
केकेआरने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. मात्र केकेआरची पहिल्या विजयाची प्रतिक्षा अद्याप कायम आहे. केकेआरने पहिले सलग 2 सामने गमावले. त्यानंतर केकेआरचा पंजाब किंग्स विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे केकेआरच्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता केकेआर घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार की लखनौ सलग दुसरा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना कधी?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना गुरुवारी 9 एप्रिलला होणार आहे.
कोलकाता विरुद्ध लखनौ कुठे?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डन्समध्ये होणार आहे.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरीस चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान केकेआर विरुद्ध लखनौ यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 6 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. लखनौने केकेआरचा 4 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला आहे. तर केकेआरला 2 सामनेच आपल्या नावावर करण्यात यश आलं आहे.
